शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

लाचखोर पोलिस उपनिरीक्षक अखेर निलंबित

Thursday, 5th March 2015 07:18:42 AM

 

गडचिरोली, ता. ५: बोल्डर व गिट़टीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी ट्रॅक्टरमालकाकडून साडेसात हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळयात सापडलेला चामोर्शीचा पोलिस उपनिरीक्षक नेपालचंद्र दिनदयाल मुजुमदार(५३) यास पोलिस अधीक्षकांनी आज निलंबित केले आहे. 

ट्रॅक्टरमालक ट्रॅक्टरद़वारे गिट़टी व बोल्डर वाहतुकीचे काम करीत होता. ट्रॅक्टर पकडल्यानंतर कारवाई न करता तो सोडून देण्याकरिता पोलिस उपनिरीक्षक नेपालचंद्र मुजुमदार याने  ट्रॅक्टरमालकाकडून साडेसात हजारांची लाच मागितली होती. ३ मार्च रोजी मुजुमदार यास वालसरा येथील पोलिस पाटील भगीरथ भांडेकर याच्यामार्फत साडेसात हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले होते. त्यामुळे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी नेपालचंद्र मुजुमदार यास आज सेवेतून निलंबित केले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
OQORV
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना