गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.२१: लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडद्वारा संचालित हेडरी येथील लॉयड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटल येथे २० एप्रिलला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात लॉयड्सचे व्यवस्थापकीय संचालक बी.प्रभाकरन यांच्यासह ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रक्तदान करुन सामाजिक बांधिलकीचा परिचय करुन दिला.
एटापल्ली तालुक्यातील सुरजागड, हेडरी परिसरातील दुर्गम आणि नक्षलग्रस्त गावांतील नागरिकांना मुलभूत आरोग्य सुविधा मिळत नव्हत्या. त्याअनुषंगाने लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडने हेडरी येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असे काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटल सुरु केले आहे. ८ नोव्हेंबर २०२३ रोजी या हॉस्पिटलने नागरिकांना सेवा देण्यास प्रारंभ केला. तेथे १० तज्ज्ञ डॉक्टर्स आणि ४० हून अधिक अन्य कर्मचारी चोवीस तास मोफत सेवा देत आहेत. सुरजागड, हेडरी, जांभिया, गट्टा इत्यादी गावांसह एटापल्ली, भामरागड आणि अहेरी तालुक्यातील अन्य गावांतील नागरिक काली अम्मल हॉस्पिटलच्या आरोग्य सेवेचा लाभ घेत आहेत.
या हॉस्पिटलमध्ये दरमहा रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. २० एप्रिलला आयोजित शिबिरात कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी.प्रभाकरन यांच्यासह ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना प्रभाकरन यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी सर्वांनी दरमहा किमान ५० युनिट रक्त देण्याचा संकल्प सोडला.