
लोक बिरादरी प्रकल्प
लोक बिरादरी प्रकल्प हा महारोगी सेवा समितीचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांनी १९७३ मध्ये माडिया गोंड नावाच्या आदिवासी जमातीच्या विकासासाठी महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात भामरागड या गावी सुरु केला. बाबांचा धाकटा मुलगा डॉ. विकास आमटे आणी त्यांच्या पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे हा प्रकल्प १९७४ पासून चालवत आहेत. या प्रकल्पात बरेच सारे समर्पित स्वयंसेवक आहेत जसे विलास आणी रेणुका मनोहर, गोपाल आणी प्रभा फडणीस, दादा आणी बबन पांचाल, जगन मचकले, मनोहर आणी संध्या यमपल्वर आणी इतर. तेव्हापासून डॉ. दिगंत आणी अनिकेत आणी त्यांच्या पत्नी यांनी पण या प्रकल्पामध्ये सहभाग घेतला आहे. डॉ. दिगंत आणि अनिकेत हे प्रकाश आमटे चे मुले आहेत. खाली लोक बिरादरी प्रकल्पाच्या चालू घडामोडी नमूद केल्या आहेत.
दवाखाना
आधुनिक विकास, शोषण आणी रोगराई यांमुळे आदिवासी जमाती विलुप्त होण्याच्या मार्गावर आहेत पण महारोगी समितीच्या जनजागृती कल्याण या कार्यक्रमांतर्गत आदिवासी जमाती आणी त्यांच्या संस्कृतीचे संरक्षण केले आहे त्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे. डॉ.प्रकाश आमटे आणी डॉ.मंदाकिनी आमटे यांनी अत्यंत अवघड परिस्थितीत आदिवासी जमातींच्या संरक्षणासाठी कामे केली आहेत. लोक बिरादरी प्रकल्प हा महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यात आहे जो माडिया गोंड आदिवासी जमातीला मदत करतो आहे. ही जमात बाहेरच्या जगापासून वेगळी करण्यात आली आहे. ह्या प्रकल्पांतर्गत प्राथमिक स्वास्थ्य ला प्राधान्य देण्यात आले होते.जंगलाच्या आतील भागात सहा उप केंद्र उघडण्यात आले होते जे मुख्य दवाखान्याच्या खूप दूर होते त्यातील तीन अजूनही चालू आहेत.हा प्रकल्प एका मोठ्या जंगलात असल्यामुळे याला अत्यंत संघर्षमय आणि अवघड परिस्थितीतून सामोरे जावे लागले. हे केंद्र १९७३ मध्ये सुरु झाले. ह्या प्रकल्पातील दवाखाना आता खूप विकसित झाला आहे.ह्या दवाखान्यात ४५ पलंग आणि दरवर्षी तो ४५,००० रुग्णांना सेवा देत आहे. हेमलकसा येथे हा दवाखाना आहे सभोवताली मोठे जंगल आहे.यामुळे माडिया गोंड आदिवासी जमातींच्या रुग्णांना आराम मिळाला आहे. दुर्गम क्षेत्रातून शेकडो रुग्ण पायी चालत येथे येतात. डॉ. प्रकाश आणी मंदाकिनी जवळपास ४५,००० रुग्णांना दरवर्षी निशुल्क उपचार सेवा देत आहेत. आदिवासींचे त्यांच्यासोबत इतके चांगले संबंध आहेत की ते जवळपासच्या राज्य सरकार प्राथमिक स्वास्थ्य केंद्राच्या एवजी १०० किलोमीटर पायी चालत येतात. कधी कधी तर त्यांना हेमलकसा ला पोहचायला ३ ते ४ दिवस लागतात.
आदिवासी मुलांसाठी १ ते १२ वर्गाची शाळा १९७५ मध्ये सुरु करण्यात आली, ती सध्या ६५० विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देत आहे. त्यांच्या निवासाची निशुल्क सेवा वसतिगृहात करण्यात येते.शैक्षणिक पुस्तके आणि वस्तू पण त्यांना मोफत देण्यात येतात. औपचारिक शिक्षणाशिवाय ते व्यावसायिक शिक्षण आणि मार्गदर्शन पण देतात जे त्यांना दररोज कामात येतात.उदा.शेती प्रशिषण, बीज उत्पादन, दुघ्धालय, बांबू शिल्प, चीनी माती कला, शिलाई, स्वास्थ्य शिक्षण. आदिवासींचे अस्तित्व टिकून ठेवणे, सामाजिक कार्याबद्दल जागरूकता आणि आपले कर्तव्य असे हे या कार्यक्रमाचे उद्देश्य आहेत.
डॉ. कन्ना मडावी, डॉ. पांडुरंग पंगती, डॉ. सुधाकर वाचामी या मडावी गोंड आदिवासी जमातींच्या मुलांनी येथे शालेय शिक्षण पूर्ण केले. डॉ. दिगंत आणि अनिकेत जी डॉ. प्रकाश आमटे यांची मुले आहेत, त्यांनी पण येथूनच आपले शिक्षण पूर्ण केले. वन्य जीवन संरक्षण अनाथ वन्य जीव प्राण्यांसाठी एक घरकुल बांधण्यात आले आहे.त्यामुळे त्यांचे निर्मम हत्येपासून संरक्षण होत आहे. हे वन्य जीव संग्रहालय देशात सर्वात मोठे आहे जो एका मनुष्याचा संग्रह आहे. हेमलकसात प्राण्यांची महान विविधता आहे. जसे चित्ता, अस्वल, हरीण, साप, मगर इत्यादी.
मोनाको साम्राज्याचे तिकीट एक फ्रेंच जोडपे ग्रीट आणी गाय बार्थेलेमी, ज्यांनी नोबेल शांती पुरस्कार विजेता डॉक्टर अल्बर्ट स्क़्वित्ज़ेर यांच्यासोबत आफ्रिकेच्या जंगलात काम केले होते ते त्यांनी एकदा आनंदवन आणी हेमलकसा ला १९९३ मध्ये भेट दिली. ते डॉ. प्रकाश आणी मंदाकिनी आमटे यांच्या कार्यामुळे एवढे प्रभावित झाले की त्यांना स्क्वेत्झेर जोडपे म्हणून घोषित केले. फ्रांस मध्ये परतल्यावर त्यांनी या गोष्टीची मोनाको साम्राज्यासोबत चर्चा केली, या चर्चेतून डॉ. प्रकाश आमटे आणी मंदाकिनी आमटे यांच्या सम्मानार्थ मोनाको साम्राज्याचे तिकीट त्यांना देण्यात आले. या अगोदर हा सम्मान फ़क़्त अल्बर्ट स्क़्वित्ज़ेर यांच्या नावे होता. हा सम्मान फ़क़्त दुसर्यांदा कोणत्या विदेशातील माणसाला म्हणजे डॉक्टर प्रकाश आमटे आणी मंदाकिनी आमटे यांना त्यांच्या मानवीय सामाजिक कार्याबद्दल देण्यात आला.