
सहकारी संस्था
ग्रामीण जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी व शेती व्यवसायीकांच्या अडचणी भागविण्यासाठी सहकार चळवळीचे मोलाचे योगदान आहे. शासनाद्वारे सहकार क्षेत्रात अनेक रोजगार योजना राबविण्यात येत आहेत. 2011-12 वर्षामध्ये जिल्हयात सर्वप्रकारच्या मिळून 889 सहकारी संस्था असुन कृषि पत संस्था मध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी संस्था 1 असुन त्यांच्या 28 शाखा कार्यरत असुन जिल्हाच्या सहकार विकासात यांचा प्रामुख्याने मोठा हातभार आहे. प्राथमिक कृषि सहकारी संस्था 139 असुन आदिवासी विकास सहकारी संस्था कार्यरत असुन त्या ग्रामीण भागात शेतींना कर्जवाटप करतात. तसेच गडचिरोली जिल्हयात 2 नागरी बॅक असुन 61 कर्मचारी सहकारी बॅका आहेत. आणि इतर बिगर-कृषि पत नागरी संस्था 53 आहेत. तसेच एकूण उत्पादन सहकारी संस्था या प्रवर्गात मोडणा-या 285 संस्था कार्यरत आहेत. आणि 222 सामाजिक सेवा सहकारी संस्था आहेत. तसेच सहकारी भात गिरण्यादेखील आहेत. सहकारी कृषि पणनसंस्थांची संख्या 6 एवढी आहे.
सभासद
एकूण 889 सहकारी संस्थेमध्ये एकूण सभासद संख्या 314 हजार सभासद आहे. त्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेत 507 सभासद असुन प्राथमिक सहकारी संस्थामध्ये 43909 आणि आदिवासी सेवा सहकारी संस्थामध्ये 73099 सभासद आहेत. तसेच नागरी बॅकेत 4661 आणि कर्मचारी सहकारी पतसंस्था मध्ये 21937 आणि इतर बिगर नागरी सहकारी परत संस्थेत 14061 इतके सभासद आहे.
ठेवी ,खेळते भांडवल, कर्ज वाटप, येणे कर्ज व थकबाकी :
एकूण 889 सहकारी संस्थामध्येे भरणा झालेले भाग भांडवल 31 मार्च,2012 411153 हजार असून त्यांचा स्वत:चा निधी 105004 हजार इतका आहे. या संस्थेकडे 31.3.2012 अखेर 2645703 हजार ठेवी असून त्यांचे खेळते भांडवल 4899006 हजार एवढे आहे. 31.3.2011अखेर खेळते भांडवल 4899006 लक्ष इतके होते. मार्च, 2012 अखेरीस एकूण 521 संस्थांना 77297 लक्ष एवढा नफा झाला. तोटयात चालणा-या संस्थांची संख्या 323 इतकी असून त्यांचा तोटयाची एकूण रक्कम 34912 हजार इतके आहे. तोटा असणा-या सहकारी संस्थांची संख्या 31.3.2012 अखेर 45 इतकी आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक हाच एकमेव सहकारी क्षेत्रातील बॅकिंगचा मुख्य स्तोत्र आहे. 31.3.2012 अखेर जिल्हयातील प्राथमिक कृषि सहकारी पत संस्थांनी आणि आदीवासी सेवा सहकारी संस्थांनी 34316 हजार 20869 कर्जदारांना वाटप केले तसेच 23862 थकबाकीदाराकडे एकूण कर्जाची थकबाकी 124889 हजार कर्जदारांकडे थकीत असल्याचे आढळते त्यापैकी तीन वर्षापेक्षा कमी कालावधीच्या कर्जाची थकबाकी 57700 हजार 9550 कर्जदारांकडे व 3 वर्षापेक्षा अधिक कालावधीचा कर्जाची थकबाकी 67189 हजार 14312 कर्जदारांकडे असल्याचे आढळते.