
रस्ता जाळे
राज्यशासनचेने सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हापरिषद अंतर्गत मार्च, 2012 अखेर 11798 कि.मी. लांबीचे रस्ते या जिल्हयात आहेत. एकूण 11798 कि.मी. लांबीच्या रस्त्यापैकी शासानाच्या बांधकाम विभागाचे 5057 कि.मी. लांबीचे रस्ते आहेत. व जिल्हापरिषद अंतर्गत 6419 कि.मी. लांबीचे रस्ते आहेत. एकूण लांबीपैकी 3252 कि.मी. लांबीचे खडीचे पक्के रस्ते आहेत. तर 3731 कि.मी.लांबीचे इतर माल वापरुन तयार केलेले रस्ते आहेत. व 4756 कि.मी. लांबीचे डांबरी रस्ते आहेत. याशिवाय जिल्हयात 322 कि.मी. लांबीचे नगरपालीका हद्दीतील रस्ते आहेत.
मोटार वाहतूक
मार्च, 2012 अखेर जिल्हयात एकूण 62469 वाहनांची नोंद झाली असून एकूण 55200 एकूण प्रवास वाहने असुन दुचाकी वाहने 51225 इतकी आहेत. माल वाहतूक करणारे वाहने 7269 इतकी वाहने असुन मागील वर्षाच्या तुलनेत 15.03 % इतकी वाहनांची नी वाढ झाली आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परीवहन महामंडळ
जिल्हयातील 100 चौ.कि.मी. ला रस्त्यांचे प्रमाण 65.06 कि.मी.पडते. जिल्हयात महाराष्ट्र परिवहन मंडळांच्या 172 बस गाडया असून रस्त्यावर धावणा-या सरासरी 169 आहेत. मागील वर्षीच्या तूलनेत संदर्भिय वर्षात 7.5 टक्के गाडयांनी वाढ झाली असुन जिल्हयातील वाहतूकीमुळे 733.9 लक्ष रुपये इतकी मागील वर्षीच्या तुलनेत उत्पन्नात वाढ झालेली आहे. जिल्हयाचा विस्तार लक्षात घेता अस्तित्वात असलेले रस्ते फार अपूरे असून रस्ते व दळणवळणाची साधने हीच या जिल्हयाची मोठी उणिव आहे. बहूसंख्य खेडी रस्त्याने जोडली गेली नसल्याने, जिल्हयाचा दक्षिण पुर्व सिमेवरील भामरागडचा पलिकडील भाग सिरोंचा तालूक्यातील रेगुटा भाग, धानोरा तालूक्यातील पेंढरीचा भाग अजूनही पावसाळयात दुर्गम राहतो. विशेषकृती कार्यक्रमाअंतर्गत रस्ते बांधणीच्या कामावर विशेष भर देण्यात आला आहे.
लोहमार्ग
जिल्हयात दक्षिण पूर्व रेल्वे अंतर्गत वडसा (देसाईगंज) व अरुणागर हे दोन रेल्वे स्टेशन असून रेल्वे गाडी चंद्रपूर जिल्हयातून चंद्रपूर स्टेशनवरुन निघून गडचिरोली जिल्हयातील वडसा (देसाईगंज) व अरुणागर या रेल्वे स्टेशवरुन पुढे गोंदीयाकडे जाते. जिल्हयातील रेल्वे मार्गाची लांबी 18.46 कि.मी. असून नॅरोगेजचे मिटरगेजमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. चंद्रपूर ते गोंदीयापर्यत नियमित वाहतूक सुरु आहे. तेंदूपानांची नी फार मोठया प्रमाणात रेल्वेने वाहतूक करण्यात येते.