सोमवार, 29 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आयपीएलवर ऑनलाईन सट्टा: दहा जणांना अटक, अहेरी पोलिसांची कारवाई             रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत           

१७ एप्रिल लक्षात ठेवा: गडचिरोली जिल्ह्यात दुपारी ३, तर चंद्रपूर जिल्हृयात संध्याकाळी ६ वाजता प्रचार बंद होणार

Tuesday, 16th April 2024 08:11:12 AM

गडचिरोली,ता.१६: निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, मतदान संपण्याच्या ४८ तासांआधी प्रचार करण्यास मनाई आहे. त्यानुसार गडचिरोली जिल्ह्‌यात १७ एप्रिलला दुपारी ३ वाजता, तर चंद्रपूर जिल्ह्यात संध्याकाळी ६ वाजता प्रचार करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

मतदान संपण्याच्या वेळेच्या ४८ तास आधी गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघामध्ये सायलेन्स पिरियड आहे. या लोकसभा क्षेत्रामध्ये ४८ तास आधी प्रचार करता येत नाही. तसेच या मतदारसंघातील रहिवासी नसलेली व्यक्ती राजकीय प्रचारासाठी या क्षेत्रात राहू शकत नाही, असे आयोगाचे निर्देश आहेत.यानुसार गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील आमगाव, आरमोरी, गडचिरोली व अहेरी या विधानसभा मतदारसंघात १७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता, तर चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी व चिमूर या विधानसभा मतदारसंघात सायंकाळी ६ वाजतानंतर प्रचारास बंदी राहील.

मतदान करण्याबाबत जनतेत जनजागृती करण्यात आली आहे. घरोघरी जाऊन वोटर गाईड देण्यात आले आहेत. मतदारांना मतदार वोटर स्लिप उपलब्ध करुन दिल्या आहेत. इपीआयसी व्यतिरिक्त कोणते दस्तऐवज मतदानासाठी वापरता येतील,याबाबत वृत्तपत्रांतून जनजागृती करण्यात आली आहे. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही,याची काळजी घेण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी मतदान केंद्रे आवश्यक सोयी-सुविधांसह सुसज्ज आहेत. जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी सर्व तयारी झालेली आहे. मतदारांनी निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
7ENL9
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना