![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
चपराळा मंदिर व अभयारण्य गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून 70 ते 75 किलोमीटर अंतरावर मुलचेरा तालुक्यातील चपराळा हे एक भाविकांच्या श्रद्धेचे स्थान आहे. येथे कार्तिकस्वामी महाराजांनी हनुमानाचे मंदिर बांधलेले आहे. त्याला लागूनच साईबाबा, शंकर, मारूती यांची मंदिरे व शिवलिंग आहे. येथे नेहमीच भाविकांची गर्दी असते. या ठिकाणी दरवर्षी महाशिवरात्रीला यात्रा भरते. हनुमान जयंतीला येथे काला व भजन, कीर्तनाचे कार्यक्रम होतात. कार्यक्रमांसाठी तेथे सभामंडपही उभारण्यात आले आहे. मंदिरापासून जवळच वर्धा-पैनगंगा नदीचा संगम आहे. यालाच प्रशांतधाम असेही म्हणतात. नदीचे पात्र विस्तीर्ण असून, दोन्ही काठ नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहेत. मंदिरासमोर आजूबाजूला घनदाट सागवान व चंदनाची झाडे आहेत. हा परिसर जंगलव्याप्त असल्याने भाविकांना येथील वातावरणआल्हाददायक वाटते. चपराळा हे अभयारण्य असून, हा परिसर वनविभागाच्या अखत्यारित आहे. येथे वनविभागामार्फत विकासकामे करण्यात येत असून, देखरेखीसाठी निरीक्षण कुटीही तयार करण्यात आली आहे. यामुळे वन्य प्राणी व वनाचे संरक्षण करण्यास मदत झाली आहे. महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरू येथे आढळतो, हे या अभयारण्याचे वैशिष्ट्य आहे. दुर्मिळ, मोठ्या आकाराच्या आणि गोंडस खारीदेखील येथे आढळतात. तसेच वाघ, बिबट्या, रानडुकर, निलगाय, सांबर, चितळ, हरीण, रानमांजर, कोल्हे, ससे इत्यादी वन्यप्राणीही आढळतात. शिवाय अनेक जातींच्या पक्ष्यांचाही येथे सदैव किलबिलाट असतो. |