रविवार, 5 मे 2024
लक्षवेधी :
  जादुटोणा प्रकरण: दोघांना जिवंत जाळणाऱ्या १५ आरोपींना ५ दिवसांची पोलिस कोठडी             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             आयपीएलवर ऑनलाईन सट्टा: दोघांवर गुन्हे दाखल, देसाईगंज पोलिसांची कारवाई             गडचिरोली जिल्हा हादरला: जादुटोण्याच्या संशयावरुन दोघांना जीवंत जाळले, १४ जणांना अटक, एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा येथील घटना             ठाणेगाव येथून १८ लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त, तिघे जण ताब्यात: स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई             छत्तीसगडमधील चकमकीत गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत चार नक्षल कमांडर ठार           

रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत

Thursday, 25th April 2024 06:46:51 AM

गडचिरोली,ता.२५: तेलंगणा राज्यात दोन जणांचा बळी घेऊन गडचिरोली जिल्ह्यात परतणाऱ्या रानटी हत्तीने आज भामरागड तालुक्यातील कियर येथील एका शेतकऱ्यास ठार केले. गोंगलू रामा तेलामी(३८) असे मृत इसमाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

३ एप्रिलला एक रानटी हत्ती मुलचेरा तालुक्यातील प्राणहिता नदी ओलांडून तेलंगणा राज्यात गेला होता. तेथील कुमुरमभीम जिल्ह्यातील चिंतलमानेपल्ली तालुक्यातील बुरेपल्ली येथील दोन शेतकऱ्यांना या हत्तीने तुडवून ठार केले. त्यानंतर हा हत्ती ६ एप्रिलला पुन्हा गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाला. सिरोंचा वनविभागातील बल्लाळम जंगलात बरेच दिवस मुक्काम ठोकल्यानंतर या हत्तीने २३ एप्रिलला अहेरी तालुक्यात प्रवेश करुन चिरेपल्ली येथील एका किराणा दुकान आणि धान्याची नासधूस केली. त्यानंतर या हत्तीने भामरागड वनपरिक्षेत्रात प्रवेश करुन आज दुपारी ४ वाजताच्या सुमारस कियर येथील शेतकरी गोंगलू तेलामी यास ठार केले. तेलामी हे शेतात काम करीत असताना हत्तीने त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

या हत्तीवर पाळत ठेवण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी तैनात असून, मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना तातडीची मदत म्हणून ५० हजार रुपये देण्यात आले आहेत. शासनाकडून मिळणाऱ्या मदतीचा धनादेश नंतर देण्यात येईल, असे गडचिरोली वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक रमेशकुमार यांनी सांगितले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
04NIC
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना