/* */
मंगळवार, 21 मार्च 2023
लक्षवेधी :
  अहेरी तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के: तेलंगणातील कागजनगरनजीकच्या दहेगावजवळ भूकंपाचा केंद्रबिंदू             अॅड. कविता मोहरकर गडचिरोली जिल्हा महिला काँग्रेसच्या नव्या अध्यक्ष             गडचिरोली: कॉम्प्लेक्स परिसरातील कृषी विभागाच्या रोपवाटिकेत ठाण मांडून बसलेली वाघीण अखेर जेरबंद             वीज कोसळून शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू: कुनघाडा-माल्लेरचक गावादरम्यानची घटना           

‘गामा’च्या संयोजकपदी श्रीमंत सुरपाम,राजेंद्र सहारे यांची निवड

Monday, 23rd January 2023 11:55:44 PM

गडचिरोली,ता.२४:डिजीटल मीडिया क्षेत्रात कार्यरत असलेल्या गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशनच्या (गामा) संयोजकपदी राईट टाईम न्यूज पोटर्लचे संपादक राजेंद्र सहारे व संतोष भारत न्यूजचे संपादक प्रा.श्रीमंत सुरपाम यांची निवड करण्यात आली आहे.

‘गामा’ची वार्षिक सर्वसाधारण बैठक गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकातील विश्रामगृहात पार पडली, त्यात दोघांची निवड करण्यात आली.बैठकीला ‘गामा’चे सदस्य तथा पूर्णसत्य न्यूज पोर्टलचे संपादक हेमंत डोर्लीकर, गडचिरोली वार्ताचे संपादक जयंत निमगडे, विदर्भ न्यूज एक्सप्रेसचे संपादक मनिष कासर्लावार, एव्हीबी न्यूज पोर्टलचे  संपादक अनिल बोदलकर, गोंडवाना टाईम्सचे संपादक व्यंकटेश दुडमवार, महाभारत न्यूजचे संपादक उदय धकाते, राईट टाईम न्यूजचे संपादक राजू सहारे, विदर्भ क्रांती न्यूजचे संपादक मुक्तेश्वर म्हशाखेत्री, संतोष भारत न्यूज पोर्टलचे संपादक प्रा.श्रीमंत सुरपाम, वृत्तवाणी न्यूज पोर्टलचे संपादक प्रवीण चन्नावार, खबर जनता तक न्यूजच्या संपादक रुपाली शेरके उपस्थित होते. बैठकीत ‘गामा’ची वर्षभरातील कामगिरी, गामा अधिक व्यापक कशी करता येईल, तसेच नवीन सदस्यांना सहभागी करून घेणे इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली.

पत्रकार परिषदेसाठी संपर्क साधण्याचे आवाहन

गडचिरोली ऑल मीडीया असोसिएशनने सर्वच क्षेत्रातील नागरिकांना त्यांची मते मांडण्यासाठी तसेच  सर्वसामान्य जनतेच्या समस्यांना वाचा फोडून न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. डिजीटल मीडियाचे महत्व लक्षात घेता ज्यांना पत्रकार परिषद आयोजित करावयाची आहे, त्यांनी गामाचे संयोजक प्रा.श्रीमंत सुरपाम (9420190877)  आणि राजेंद्र सहारे (8830435322)  यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
TR2K5
  © 2014 - 2023 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना