/* */
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2023
लक्षवेधी :
  बलात्कार करुन प्रेयसीची हत्या करणाऱ्या युवकास जन्मठेपेची शिक्षा: ग्डचिरोलीच्या अपर जिल्हा व सत्र न्यायालयाचा‍ निवाडा             बचत गटाच्या नावाखाली अवैध सावकारी करणाऱ्या नवेगावच्या २ महिलांच्या घरावर सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांची धाड: आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त             मुरुमगाव येथील ३ कोटींच्या धान खरेदी घोटाळ्याप्रकरणी आणखी चार जणांना अटक             क्रूझर-मोटारसायकल अपघातात २ ठार,१० जण जखमी, तिघांची प्रकृती गंभीर: कोरची-कुरखेडा मार्गावरील मोहगाव नजीकची घटना           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

एसबीआयच्या ग्राहक सेवा केंद्रातून ग्राहकांची ५ लाखांची फसवणूक, दोघांना अटक

Friday, 2nd December 2022 02:45:17 AM

कोरची,ता.२: कुरखेडा येथील भारतीय स्टेट बँकेने कोरची तालुक्यातील ग्राहकांना सेवा देण्यासाठी सुरू केलेल्या ग्राहक सेवा केंद्राद्वारे ग्राहकांची ४ लाख ९५ हजार रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी दोन केंद्र संचालकांना कोरची पोलिसांनी अटक केली आहे.

संजित अशोक सरदारे(२९),रा.नान्ही, ता.कुरखेडा व वीरेंद्र टेंभुर्णे,रा.कोसमी,ता.कोरची अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. कुरखेडा येथे भारतीय स्टेट बँकेची शाखा आहे. परंतु अशी शाखा कोरचीत नसल्याने त्या तालुक्यातील ग्राहकांच्या सेवेसाठी बँकेने नागपूर येथील पेपॉईंट इंडिया नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून तेथे ग्राहक सेवा केंद्रे उघडली. परंतु केंद्र संचालकांनी बनावट आरडी खाते पासबूक तयार केले. त्यावर बनावट खाते क्रमांक लिहून खातेदारांनी जमा केलेली रक्कम स्वत:जवळ ठेवली.अशाप्रकारे केंद्र संचालकांनी एकूण ४ लाख ९५ हजार रुपयांचा अपहार केला.ही बाब लक्षात येताच पेपॉईंट इंडिया नेटवर्कचे विक्री व्यवस्थापक नंदकिशोर कावळे यांनी कोरची पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी संजित सरदारे व वीरेंद्र टेंभुर्णे यांच्यावर गुन्हे दाखल करुन अटक केली.न्यायालयाने आरोपींना पोलिस कोठडी सुनावली आहे.

उपविभाग विभागीय पोलिस अधिकारी महेश झरकर यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक अमोल फरतडे प्रकरणाचा तपास करीत आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
TS0G0
  © 2014 - 2023 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना