शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

२५ मार्चपासून तुमच्या घरात येणार नाही वर्तमानपत्र

Tuesday, 24th March 2020 08:16:16 AM

गडचिरोली,ता.२४: कोरोना विषाणूमुळे उदभवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, विदर्भातून प्रकाशित होणारे एकही प्रादेशिक वृत्तपत्र वाटप न करणाऱ्याचा निर्णय विदर्भ डेली न्यूज पेपर असोशिएशन(व्हीडीएनए) या संघटनेने घेतला आहे.

कोरोना विषाणूमुळे जगभरात भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग ज्या गोष्टींमुळे होतो, त्यात वृत्तपत्र हेही एक आहे, असे सांगितले जाते. कारण वृत्तपत्र छपाईपासून ते घरोघरी पोहचेपर्यंत अनेक व्यक्तींकडून हाताळले जाते. त्याविषयीचे व्हीडीओही व्हायरल झाले आहेत. असे असतानाही अनेक वर्तमानपत्रांनी जाहिराती करुन ‘आम्ही मशिनद्वारे वृत्तपत्रांच्या घड्या करतो, पॅकेजिंग करतो’ असे सांगितले. शिवाय छापखान्यांमध्ये वृत्तपत्र छपाई करताना सॅनिटायझर्सचाही वापर करणे सुरु केले. तरीही  लोकहितासाठी वृत्तपत्र छपाई व वितरण बंद करण्याचा निर्णय सर्व वृत्तपत्रांना घ्यावा लागला आहे.

आज २४ मार्चला नागपुरात झालेल्या व्हीडीएनएच्या बैठकीत ३१ मार्चपर्यंत विदर्भातील प्रादेशिक वृत्तपत्रांचे वितरण बंद ठेवण्याच्या निर्णय घेण्यात आला. १ एप्रिलपासून वृत्तपत्रांचे नियमित वितरण सुरु होणार आहे.

आणीबाणीच्या काळानंतर सतत आठवडाभर वर्तमानपत्र बंद ठेवण्याची ही मागील ४३ वर्षांतील बहुदा ही पहिलीच वेळ असावी. यामुळे दैनंदिन घडामोंडीसाठी आता नागरिकांनी वृत्तवाहिन्या व न्यूज पोर्टलवरच अवलंबून राहावे लागणार आहे.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
5SS1N
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना