शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

मार्कंडादेव येथील शिक्षक परिषदेच्या जिल्हा अधिवेशनात विविध ठराव पारित

Sunday, 12th January 2020 05:51:59 AM

गडचिरोली, ता.१२: महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे २९ वे  जिल्हा अधिवेशन  चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव  येथे आज पार पडले. या अधिवेशनात विविध ठराव पारित करण्यात आले. गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन झाले. विशेष अतिथी म्हणून आमदार  प्रा. अनिल  सोले, स्वागताध्यक्ष  आमदार डॉ. देवराव होळी, शिक्षक आमदार नागो गाणार, भाजपा आदिवासी आघाडीचे  जिल्हाध्यक्ष प्रकाश गेडाम, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष स्वप्निल वरघंटे, शिक्षक परिषदेचे विभागीय अध्यक्ष के.के.वायपेयी, सत्यम चकिनारप  उपस्थित होते. या अधिवेशनात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करुन विविध ठराव पारित करण्यात आले. शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध राहू, अशी ग्वाही यावेळी खा.नेते, आ. सोले, आ. होळी व आ.गाणार यांनी दिली. या अधिवेशनाला जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
415X0
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना