सोमवार, 20 जानेवारी 2020
लक्षवेधी :
  चातगाव वनपरिक्षेत्रातील अमिर्झा बिटात वाघिणीचा मृत्यू, भुकेमुळे मृत्यू झाल्याचा अंदाज             गडचिरोली जिल्हा परिषदेच्या सभापतिपदांवर भाजप-राष्ट्रवादी युतीचा वरचष्मा, काँग्रेसचा दारुण पराभव             गडचिरोली जिल्हा परिषदेचे चार सदस्य अपघातात गंभीर जखमी-कुरखेडा तालुक्यातील लेंडारी गावाजवळची घटना             प्रशासनाने घडविले गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागातील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना 'इस्रो'चे दर्शन             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

गडचिरोलीच्या आठ विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय योग स्पर्धेकरिता निवड

Friday, 13th December 2019 02:37:22 PM

 

गडचिरोली,ता.१३: बृहन्महाराष्ट्र योग परिषद अमरावतीशी संलग्न गडचिरोली जिल्हा योग असोसिएशन, आरमोरीतर्फे आरमोरी येथे झालेल्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत गडचिरोली येथील आठ विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय योग स्पर्धेकरिता निवड झाली आहे.

आरमोरी येथे झालेल्या स्पर्धेत ८ ते १३ वर्षे वयोगटातील मुलींमध्ये अदिती हेमके हिने प्रथम, कावेरी प्यारमवार द्वितीय, तर मुलांमध्ये डेविड जांगी याने प्रथम व प्रज्वल निमगडे याने तृतीय क्रमांक पटकावला. १३ ते १७ वर्षे वयोगटातील मुलींमध्ये राधिका कलंत्री हिने प्रथम व अनुजा म्हशाखेत्री हिने द्वितीय क्रमांक पटकावला. २५ ते ३५ वयोगटात विशाल भांडेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांच्या सोबतच ८ ते १३ वयोगटात मोहित वाघरे आणि ३५ ते ५० वर्षे वयोगटात कल्पना म्हशाखेत्री यांचीही या स्पर्धेकरिता निवड झाली आहे. हे सर्वजण आज राज्यस्तरीय योग स्पर्धेकरिता रवाना झाले. १३, १४ व १५ डिसेंबर या कालावधीत यवतमाळ येथील बाबासाहेब नांदुरकर अभियांत्रिकी महाविद्यालयात ही स्पर्धा होणार आहे.

योग शिक्षक अनिल निकोडे यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
5HWS5
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना