शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

परिचारिकेवरील अत्याचाराविरोधात गडचिरोलीत निषेध रॅली

Thursday, 12th December 2019 05:26:57 AM

गडचिरोली,ता.१२: देसाईगंज तालुक्यातील परिचारिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या निषेधार्थ आज नर्सेस संघटनेच्या नेतृत्वात विविध सामाजिक संघटनांनी शहरात निषेध रॅली काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

८ डिसेंबर रोजी देसाईगंज येथील एका खासगी रुग्णालयात कार्यरत परिचारिकेवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. या घटनेच्या विरोधात आज दुपारी इंदिरा गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध रॅली काढण्यात आली. त्यानंतर आरोपीस कठोर शिक्षा व्हावी, यासह अन्य मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. या रॅलीत राज्य नर्सेस संघटनेच्या पदाधिकारी, जिल्हा माळी समाज संघटनेचे सचिव रमेश जेंगटे, हरिदास कोटरंगे, सुखदेव जेंगठै, संतोष मोहुर्ले, नरेश महाडोरे, माळी महिला संघटनेच्या तालुकाध्यक्ष सुधा चौधरी, सचिव अल्का गुरनुले, सदस्य मीना जेंगठै, संजीवनी कोटरंगे, ज्योती जेंगठै, वंदना मोहुर्ले, प्रभा सोनुले, मंगला मांदाडे, मनिषा निकोडे, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे जिल्हाध्यक्ष उध्दव डांगे, विलास निंबोरकर, आधार विश्व फाऊंडेशनच्या प्रा.सुनीता साळवे व अन्य सामाजिक संघटेनेचे पदाधिकारी, परिचारिका व विविध जाती धर्माचे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
41O66
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना