शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

विहिरीत उडी घेऊन युवकाची आत्महत्या

Friday, 21st November 2014 04:01:06 AM

 

गडचिरोली, ता़२१

चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथून जवळच असलेल्या मुरमुरी येथील एका युवकाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल २० नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. सुनील रामभाऊ नागूलवार (३५) असे मृत युवकाचे नाव असून तो विवाहित आहे. आई-वडिलांशी पटत नसल्याने दोन वर्षापासून सुनील ठाकरी येथे सासूरवाडीला राहत होता. त्याला दारूचे व्यसन जडले होते. १८ नोव्हेंबर रोजी सासरकडील मंडळीशी वाद घालून तो घराबाहेर निघून गेला होता. गुरूवारी त्याचा मृतदेह  ठाकरी गावाजवळच्या  विहिरीत आढळून आला. याप्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला आहे. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
1VHNJ
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना