शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

विनयभंग करणाऱ्या आरोपीस ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

Thursday, 5th December 2019 08:09:37 AM

गडचिरोली,ता.५: मुलगी घरी एकटीच असल्याची संधी साधून तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस विशेष  सत्र न्यायालयाने ५ वर्षांचा सश्रम कारावास व २६ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. गौतम मनोज भैसारे, रा.साखरा, ता.गडचिरोली असे दोषी युवकाचे नाव आहे.

पीडित मुलगी ही दुकानात एकटीच असताना आरोपी गौतम भैसारे तिच्या दुकानात खर्रा खाण्यासाठी गेला. त्यानंतर ती पैसे ठेवण्यासाठी घरी गेली असता गौतमही तिच्या पाठोपाठ गेला. त्यानंतर त्याने पीडित मुलीचा विनयभंग केला. मुलीने प्रतिकार करताच आरोपी गौतम तेथून पळून गेला. त्यानंतर पीडितेच्या आईने गडचिरोली पोलिस ठाण्यात तक्रार केली.

तक्रारीवरुन पोलिसांनी गौतम भैसारे याच्यावर  भादंवि कलम ३५४, ४४८ व बालैंसं कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन अटक केली.. पोलिस उपनिरीक्षक तेजस्वी पाटील यांनी तपास पूर्ण करुन आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

आज या प्रकरणाचा निकाल लागला. विशेष सत्र न्यायालयाने साक्ष पुरावा तपासून व सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य मानून आरोपी गौतम भैसारे यास दोषी ठरवून ५ वर्षांचा सश्रम कारावास व २६ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. तसेच या रकमेतून पीडितेला २० हजार रुपये भरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.  सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल प्रधान यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून प्रकाश तुनकलवार यांनी जबाबदारी सांभाळली


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
AR5MR
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना