रविवार, 15 डिसेंबर 2019
लक्षवेधी :
  तेली समाजाने संघटित होऊन ताकद दाखवून द्यावी-गडचिरोली येथील तेली समाजाच्या मेळाव्यात खा.रामदास तडस यांचे आवाहन             देसाईगंज येथील राष्ट्रीय लोक अदालतीत ६३ प्रकरणांचा निपटारा             गडचिरोलीच्या ८ विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय योग स्पर्धेकरिता निवड             महावितरणला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचा दणका-वीज चोरीच्या आरोपावरुन ग्राहकास पाठविलेले अतिरिक्त बिल व दंड रद्द करण्याचे आदेश             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

भाजप नेत्यासह अन्य नागरिकांवर रेती तस्करीप्रकरणी गुन्हा दाखल

Thursday, 28th November 2019 02:16:09 PM

गडचिरोली,ता.२८: रेतीची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी तहसीलदारांच्या तक्रारीवरुन भाजप नेते साईनाथ साळवे, त्यांचा मुलगा सारंग साळवे यांच्यासह अन्य काही नागरिकांवर धानोरा पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

२३ नोव्हेंबरच्या रात्री नायब तहसीलदार सौ.लोणारे यांना रेती तस्करांवर कारवाई करण्यासंदर्भात गडचिरोलीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडून तोंडी आदेश प्राप्त झाले. त्यानुसार रात्री अडीच वाजताच्या सुमारास नायब तहसीलदार सौ.लोणारे यांनी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचे पथक घेऊन तपासणी सुरु केली. यावेळी मुरुमगाव-धानोरा मार्गावर एक ट्रक आढळून आला. त्यांनी तो थांबवून चौकशी केली असता त्यातून रेतीची अवैध वाहतूक करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे सौ.लोणारे यांनी जप्ती पंचनामा करुन ट्रक मंडळ अधिकारी कार्यालयाजवळ लावण्यास सांगितले. परंतु महसूल अधिकाऱ्यांना न जुमानता ट्रक चालक ट्रक घेऊन पळून गेला. त्यानंतर पथकाचे कर्मचारी धानोरा-मुरूमगाव मार्गावरील चिचोली घाटावर धडकले. तेव्हा नदीघाटावर एक वाहन क्रमांक नसलेला; परंतु रेती भरलेला ट्रॅक्टर ट्रॉलीसह आढळून आला.  ट्रॅक्टरकडे जात असताना त्यांचे वाहन नदीपात्रातील रेतीत फसले म्हणून ते काढण्याचा प्रयत्न सुरू होता. याचवेळी जवळच्या सालेभट्टी गावातून पंधरा ते वीस महिला व पुरुष नदीघाटावर लाठ्या, काठ्या व बॅट घेऊन आले. त्यातील एका महिलेने नायब तहसीलदार सौ. लोणारे यांचा हात धरुन ट्रॅक्टरवर कारवाई न करण्याची दमदाटी केली. उपस्थित नागरिकांनीही महसूल अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली. याचवेळी एक व्यक्ती ट्रॅक्टर घेऊन पळून गेला. त्यानंतर नायब तहसीलदार लोणारे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार धानोरा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरुन पोलिसांनी भाजप नेते साईनाथ साळवे व त्यांचा मुलगा सारंग साळवे यांच्यासह गणेश भुपतवार, कपिल कुमरे, सौरभ मडकाम तसेच सालेभट्टी गावातील अन्य दहा ते वीस अज्ञात नागरिकांवर अपराध क्रमांक ८७ व ८८, भादंवि  भादंवि कलम ३९६ व ३५३ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. एपीआय सुरेश साळुंखे घटनेचा तपास करीत आहेत. या प्रकरणातील आरोपी साईनाथ साळवे, पंकज साळवे, गणेश भुपतवार, कपिल कुमरे व सौरभ मडकाम हे सर्व फरार असल्याचे तपास अधिकार्‍यांनी सांगितले.

गडचिरोलीतही रेती तस्करांची मुजोरी

गडचिरोली शहरातही रेतीची बेभाव विक्री सुरु असून, एकाच टीपीवर दिवसभर रेतीची वाहतूक सुरु असल्याचे निदर्शनास येत आहे. काही जणांनी विशिष्ट ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त रेतीची साठवणूक केली आहे. अनेक जण छत्तीसगडची टीपी वापरुन धानोरा तालुक्यातील नद्या व नाल्यांमधून रेतीची अवैधरित्या वाहतूक करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्यावर कोण कारवाई करणार, असा प्रश्न आता विचारला जात आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
D95R7
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना