शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

कोरचीतील ‘त्या’ बिबट्याचा अखेर नागपुरात मृत्यू

Friday, 14th November 2014 08:27:53 AM

 
गडचिरोली, ता़१४
कोरची तालुक्यातील नवरगावजवळ जखमी अवस्थेत आढळलेल्या बिबट्याचा आज(ता़१४)नागपुरात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची विश्वसनीय माहिती आहे़ गेल्या दोन दिवसांत दोन वाघांचा मृत्यू झाल्याने वनविभागाबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे़
१२ नोव्हेंबरला नवरगाव येथे एक बिबट्या जखमी अवस्थेत आढळून आला होता़ त्यादिवशी रात्रीपर्यंत पिंजर्‍याची व्यवस्था न झाल्याने जखमी बिबट्याला विव्हळत राहावे लागले़ त्यानंतर १३ नोव्हेंबरला सकाळी बिबट्याला पिंजर्‍यात जेरबंद करण्यात आले़ त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी बिबट्यावर प्रथमोपचार केल्यानंतर त्यास नागपूरला हलविण्यात आले़ नागपुरात या बिबट्याने अखेरचा श्वास सोडल्याची माहिती आहे़ वनाधिकार्‍यांच्या लापरवाहीमुळे बिबट्याला प्राण गमवावा लागल्याने वन्यजीवप्रेमींमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे़
गडचिरोली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत दोन वाघांचा मृत्यू झाला आहे़ १२ तारखेला चामोर्शीनजीक एक पट्टेदार वाघीण मृतावस्थेत आढळली होती़ त्यानंतर आता कोरचीत बिबट्याचा मृत्यू झाला आहे़


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
XTRXU
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना