शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

आईचा खून करणाऱ्या मुलास आजन्म कारावासाची शिक्षा

Tuesday, 30th April 2019 06:54:02 AM

गडचिरोली, ता.३०: खर्चासाठी पैसे न दिल्याने आईचा खून करणाऱ्या मुलास येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आजन्म कारावास व पाचशे रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सुनील नारायण धानोरकर(३०)रा.आलापल्ली, ता.अहेरी असे शिक्षा झालेल्या दोषी युवकाचे नाव आहे.

१ एप्रिल २०१५ रोजी आरोपी सुनील धानोरकर याने त्याची आई वच्छला धानोरकर हिला स्वखर्चाकरिता पैसे मागितले. मात्र, आईने पैसे देण्यास नकार दिल्याने सुनीलने तिला घराबाहेर काढून पाठलाग करीत तिच्या डोक्यावर लाकडी दांड्याने प्रहार केला. यात वच्छला धानोरकर ही जागीच ठार झाली. त्यानंतर सुनीलने पाण्याच्या टाकीवर चढून उडी मारली. मात्र, गावकरी व पोलिसांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपी सुनीलची नातेवाई रंजिता संदीप वाघरे हिने अहेरी पोलिस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आरोपी सुनील दानोरकर याच्याविरुद्ध भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला. तत्कालिन पोलिस उपनिरीक्षक फिरोज मुलानी यांनी गुन्ह्याचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. 

आज या खटल्याचा निकाल लागला. जिल्हा व सत्र न्यायालयाने साक्ष पुरावा व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपी सुनील धानोरकर यास आजन्म कारावास व पाचशे रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातफे जिल्हा सरकारी वकील अनिल प्रधान यांनी काम पाहिले. सहायक पोलिस निरीक्षक शरद मेश्राम यांनी कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
BFD73
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना