शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

नक्षलवाद्यांनी मतदान केंद्राजवळ घडविला स्फोट

Wednesday, 10th April 2019 11:45:17 PM

गडचिरोली,ता.११: लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु असताना आज नक्षल्यांनी एटापल्ली तालुक्यातील कसनसूर उपपोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाघेझरी येथील  जुन्या मतदान केंद्राजवळ भूसुरुंगस्फोट घडवून आणला. 

वाघेझरी येथील जिल्हा परिषद शाळेत मतदान केंद्र ठेवण्यात आले होते. परंतु हे मतदान केंद्र सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य नसल्याने नंतर त्यात बदल करुन ते अन्यत्र हलविण्यात आले. आज सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास नव्या मतदान केंद्रावर मतदान सुरु असताना नक्षल्यांनी जुन्या मतदान केंद्राजवळ पेरुन ठेवलेल्या भूसुरुंगाचा स्फोट केला. यात कुणीही जखमी झाले नाही. स्फोट झालेले ठिकाण नव्या मतदान केंद्रापासून दूर अंतरावर आहे. अचानक झालेल्या भूसुरुंगस्फोटामुळे तेथे तैनात पोलिस जवानांमध्ये एकच खळबळ उडाली. काल गट्टा-जांभिया गावात नक्षलवाद्यांनी असाच स्फोट घडविल्याने एक जवान जखमी झाला होता.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
97JSK
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना