शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

लोहखनिज उत्खनन सुरु करण्याच्या आश्वासनानंतर मजुरांच्या उपोषणाची सांगता

Thursday, 7th February 2019 07:17:58 AM

गडचिरोली, ता.७: एका अपघातानंतर बंद झालेले सुरजागड पहाडावरील लोहखनिजाच्या उत्खननाचे काम पूर्ववत सुरु करण्याच्या आश्वासनानंतर आज तिसऱ्या दिवशी मजुरांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आरंभिलेले साखळी उपोषण थांबविले.

लॉयड मेटल्स अॅंड एनर्जी लिमिटेड या कंपनीद्वारे सुरजागड पहाडावरील लोहखनिज उत्खननाचे काम सुरु होते. परंतु १६ जानेवारीला गुरुपल्ली गावाजवळ लोहखनिज वाहतूक करणाऱ्या एका ट्रकने बसला चिरडल्याने चार जण ठार झाले. या अपघातानंतर अचानक लोहखनिज उत्खननाचे काम बंद करण्यात आले. यामुळे शेकडो मजुरांच्या हातचे काम हिरावले गेले. त्यानंतर काम सुरु करण्यासाठी पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना मजुरांनी एक पत्र दिले होते. काम सुरु न झाल्यास उपोषण करण्याचा इशाराही मजुरांनी दिला होता. परंतु प्रशासनाने दखल न घेतल्याने अनेक मजुरांनी ५ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे साखळी उपोषण होते.

अखेर आज आ.डॉ.देवराव होळी, अतिरिक्त जिल्हाधिकारी दामोधर नान्हे, लॉयड मेटल्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे उपाध्यक्ष अतुल खाडिलकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी लवकरात लवकर लोहखनिज उत्खनन सुरु करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मजुरांनी उपोषणाची सांगता केली.

सुरजागड पहाडावरील लोहखनिज उत्खननाचे काम सुरु करण्यास लॉयड मेटल्स कंपनी व प्रशासनाची भूमिका सकारात्मक आहे. या कामातून स्थानिक नागरिकांना रोजगार देण्याचे कंपनीचे धोरण आहे. सोबतच कोनसरी येथील प्रकल्पही सुरु करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. प्रशासनातर्फे कार्यस्थळी पुरेशी सुरक्षा मिळाल्यास महिन्यातून २५ दिवस उत्खननाचे कार्य सुरु ठेवता येईल व त्यामुळे मजुरांना २५ दिवस रोजगार मिळेल, असे लॉयड मेटल्स कंपनीचे उपाध्यक्ष अतुल खाडिलकर यांनी यावेळी सांगितले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
U95NM
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना