शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

बिबट्याच्या हल्ल्यात तिघे जखमी

Saturday, 19th January 2019 06:52:55 AM

 

कुरखेडा, ता.१९:तालुक्यातील सोनसरीनजीकच्या खापरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी झाल्याची घटना आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली  या घटनेने परिसरात भीती निर्माण झाली आहे 

शामराव मडावी, सुभाष जगन भोयर रा.खापरी व सुभाष देवनाथ करपते रा.चिनेगाव अशी जखमींची नावे आहेत. बिबट्याला जंगलात हाकलत असताना त्याने हल्ला करून तिघांनाही जखमी केले.

खापरी येथे आज सकाळी गावात आलेल्या बिबट्याला पिटाळून लावण्याकरिता गावकऱ्यांनी एकत्र येऊन हातात काठ्या घेऊन बिबट्याचा पाठलाग केला. बिबट एका गुहेत दडून बसला होता. काही क्षणातच त्याने गावकऱ्यांवर प्रतिहल्ला चढविल्याने तीन गावकरी जखमी झाले. मात्र, इतर गावकरी मदतीला धावून गेल्याने बिबट्याने तेथून पळ काढला. शामराव मडावीच्या पायाला व सुभाष करपतेच्या हाताला दुखापत झाली आहे, तर सुभाष भोयर यांना किरकोळ जखम असल्याने गावीच उपचार करण्यात आला. दोन महिन्यांपूर्वी बिबट्याने सोनसरीनजीकच्या मोहगाव येथील ऐका इसमास ठार केले होते. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली असून सोनसरी परिसरात असलेल्या या बिबट्याचा वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात आली आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
681T0
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना