शनिवार, 19 जानेवारी 2019
लक्षवेधी :
  जिल्हा प्रशासनाने जाहीर केली २०१८-१९ ची खरीप पिकांची पैसेवारी, १६८८ गावांपैकी १२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाहून अधिक             देलोडा बिटाचा वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात, रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी मागितली १० हजारांची लाच             भीषण अपघातात ४ जण ठार, मृतकांमध्ये तीन कर्मचारी व एका विद्यार्थ्याचा समावेश, एटापल्लीनजीकच्या गुरुपल्ली येथील घटना, संतप्त नागरिकांनी १० ते १५ ट्रक पेटवले             उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीसाठी शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेपुढे केले असहकार आंदोलन             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

वेतन न मिळाल्याच्या नैराश्यात साजरा झाला शिक्षक 'दीन'

Wednesday, 5th September 2018 09:55:52 AM

गडचिरोली, ता.५: देशभरातील शिक्षक उत्साहात शिक्षक दिन साजरा करीत असताना गडचिरोली जिल्ह्यातील काही शिक्षकांना मात्र वेतन न मिळाल्याची नाराजी मनाशी बाळगून आपला 'सण' साजरा करावा लागला. त्यामुळे अनेक शिक्षकांनी आजच्या शिक्षक दिनाचा उल्लेख 'शिक्षक दीन' असा करुन आपला संताप व्यक्त केला.

देशात अनेक दिवस सण म्हणून साजरा केले जातात. या सणांशिवाय अभियंता दिन, परिचारिका दिन, डॉक्टर्स डे असे अनेक दिवस विशिष्ट कर्मचाऱ्यांच्या वाट्याला आले असून, हे कर्मचारी आपापले दिवस सणासारखे साजरे करीत असतात. शिक्षक दिनदेखील असाच उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी जिल्हा व राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा गौरवही केला जातो. आज असाच एक कार्यक्रम जिल्हा परिषद सभागृहात झाला. मात्र, या कार्यक्रमावर वेतन न मिळाल्याच्या नाराजीचे सावट दिसून आले.

गडचिरोली, धानोरा, कोरची व अन्य काही पंचायत समित्यांमधील शिक्षकांना मागील दोन ते तीन महिन्यांचे वेतन अजूनही मिळालेले नाही. गटशिक्षणाधिकारी व संबंधित विभागाच्या कारकुनांच्या हलगर्जीपणामुळे शिक्षकांवर 'दीन' होण्याची पाळी आल्याचा आरोप शिक्षक संघटनांकडून केला जात आहे. यंदाच्या सत्रापूर्वी ऑनलाईन बदली झालेल्या शिक्षकांच्या सेवापुस्तिका संबंधित पंचायत समित्यांना पाठविण्यात दिरंगाई केली जात आहे. हेही वेतन न मिळण्याचे एक कारण आहे. एकूणच वेतनाअभावी शिक्षकांना आपला आनंदाचा दिवस नाराजीत साजरा करावा लागला.

स्टॉफचे वेतन होते;मग शिक्षकांचे का नाही- सत्यम चकिनारप

जून महिन्यापासून वेतन नाही. बेजबाबदार अधिकारी यास कारणीभूत आहेत. वेतनाअभावी शिक्षक अडचणीत सापडला आहे. शिक्षण विभागातील स्टॉफचे वेतन होते;मग शिक्षकांचे का नाही, असा सवाल उपस्थित करुन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य उपाध्यक्ष सत्यम चकिनारप यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध केला.

अधिकारी, कर्मचाऱ्यांची दिरंगाई कारणीभूत: आशिष धात्रक

जून महिन्यापासून वेतन मिळत नसेल, तर शिक्षकांनी काय करायचे? जिल्हा परिषदेकडे निधी उपलब्ध आहे. परंतु दप्तर दिरंगाईमुळे शिक्षकांना वेठीस धरले जात आहे. त्यांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा सवाल राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस आशिष धात्रक यांनी केला.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
4X50A
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना