शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

तीन वर्षीय आदिवासी बालिका दुर्धर आजाराने ग्रस्त

Friday, 15th August 2014 08:12:26 AM

गडचिरोली, ता. १५ : धानोरा तालुक्यातील अतिदुर्गम मरमा या गावातील एक तीन वर्षीय आदिवासी बालिकेस अंधत्व आले असून, तिला ‘म्युकोपॉलिसॅक्रायडोसीस’ या दुर्धर आजाराने ग्रासल्याचा अंदाज तज्ज्ञ डॉक्टरांनी वर्तविला आहे. तिचे प्राण वाचविण्यासाठी नागरिकांनी तिला आर्थिक मदत करावी, असे आवाहन गुरुवारी (ता. १४) बालिकेचे वडील मंगलसिंग उसेंडी व ‘सोच’संस्थेचे प्रमुख डॉ. नंदू मेश्राम यांनी पत्रकार परिषदेत केली.

डॉ. नंदू मेश्राम यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी ‘सोच’(सोसायटी फॉर ओरल हेल्थ अ‍ॅन्ड कॅन्सर) या संस्थने आरोग्य तपासणी शिबिर घेतले होते. त्यावेळी  मरमा या गावातील अम्रिका मंगलसिंग उसेंडी ही बालिका जन्मत:च अंध असल्याचे दिसून आले. त्यानंतर तिला डोळ्यांच्या तपासणीसाठी नागपूर येथे नेले असता तिला कॉन्जेनायटल ग्लुकोमा हा आजार असल्याचे आढळून आले. पुढे तिची तपासणी बालरोग तज्ज्ञ डॉ. आनंद भुतडा यांनी केली. त्यावेळी डॉ. भुतडा यांनी अम्रिकाला जडलेला आजार  ‘म्युकोपॉलिसॅक्रायडोसीस’ असण्याची शक्यता व्यक्त केली.

या आजाराची तपासणी व उपचार नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयातच होत असते. त्यामुळे ‘सोच’ संस्थेने तिला ‘एम्स’ रुग्णालयात भरती केले.  तेथील डॉक्टरांनी अम्रिकाच्या डोळ्यांची तपासणी करून शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. या आजाराच्या निदानासाठी ब-याच तपासण्या करणे आवश्यक असून, त्यांचा खर्च लाखाच्या घरात जातो. बहुतांशवेळा अशा आजाराचे रुग्ण निदानाअभावी दगावल्याचे निदर्शनास आले आहे.  एम्सने १७ ऑगस्ट रोजी शस्त्रक्रियेसाठी तिला भरती करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, अम्रिकाचे वडील मंगलसिंग उसेंडी यांची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने सामाजिक संस्था, राज्य शासन व केंद्र शासनाने तिला आर्थिक मदत करावी, त्यासाठी मंगलसिंग उसेंडी यांच्या ९४०३२५४३२५ किंवा ‘सोच’ संस्थेच्या ९४०३३२५३३८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. नंदू मेश्राम यांनी केले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
K9DA4
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना