शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला गैरआदिवासींचा विराट मोर्चा

Thursday, 14th August 2014 04:57:27 AM

 
गडचिरोली, ता़१४ 
महामहीम राज्यपालांनी पेसा कायद्यांतर्गत नोकरीसंबंधी काढलेली अधिसूचना रद्द करावी, गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण १९ टक्के करावे,या प्रमुख मागण्यांसह गैरआदिवासींच्या इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज (ता. १४) गैरआदिवासी सुशिक्षित बेरोजगार संघटना व विविध संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला़ 
महामहीम राज्यपालांनी ९ जून २०१४ रोजी नोकरीसंबंधी ‘पेसा’ कायद्याबाबत अधिसूचना काढून वर्ग ३ व ४ च्या पदभ्र‍रतीत पेसा गावांतर्गत १०० टक्के आदिवासी उमेदवारांचीच भ्र‍रती करावी, असे नमूद केले आहे. या अधिसूचनेमुळे जिल्ह्याच्या नोकर भ्र‍रतीतून गैरआदिवासी उमेदवार हद्दपार होणार आहेत. यामुळे ही अधिसूचना रद्द करावी, जिल्हा निवड मंडळ स्थापन करून नोकरभ्र‍रतीत जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांनाच सामावून घ्यावे, ओबीसींचे आरक्षण ६ टक्क्यावरून पूर्ववत १९ टक्के करावे इत्यादी मागण्यांसाठी आज दुपारी १२ वाजता गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकातून मोर्चा काढण्यात आला़ या मोर्चात बेरोजगार संघटनेचे नेते संतोष बोलुवार, नगराध्यक्षा निर्मला मडके, माजी नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार, युवक काँग्रेसचे नेते पंकज गुड्डेवार, नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश सावकार पोरेड्डीवार, युवा शक्ती संघटनेचे नेते प्रा़राजेश कात्रटवार, प्रा़रमेश चौधरी, सचिन बोबाटे, दीपक मडके, सुरेंद्रसिंह चंदेल, जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभ्र‍ापती छायाताई कुंभ्र‍ारे,भ्र‍ाजपा नेते प्रमोद पिपरे, रमेश भ्र‍ुरसे, प्रशांत वाघरे, आरमोरीचे युवा नेते पंकज खरवडे, वेणूताई ढवगाये, ओबीसी कर्मचारी संघटनचे प्रा़शेषराव येलेकर, सतीश विधाते, पांडुरंग घोटेकर, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड़राम मेश्राम, शिवसेना जिल्हाप्रमुख हरीश मने, अरविंद कात्रटवार, जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभ्र‍ापती अतुल गण्यापवार, नगरसेवक विजय गोरडवार, नामदेवराव गडपल्लीवार, जिल्हा परिषद सदस्य अमोल मारकवार, युवक काँग्रेसचे नेते अतुल मल्लेलवार, रजनीकांत मोटघरे, मनसे नेते राजेंद्र साळवे, विश्वास देशमुख, स्वप्नील वाढई, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भ्र‍रडकर यांच्यासह विविध राजकीय पक्ष व सामाजिक क्षेत्रातील नागरिक आणि बेरोजगार युवक मोठ्या संख्येने सहभ्र‍ागी झाले होते़ तत्पूर्वी चौकात आदींची भ्र‍ाषणे झाली़ 
मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचल्यानंतर तेथे सभ्र‍ा घेण्यात आली़ या सभ्र‍ेत वक्त्यांनी सरकारवर टीकेची झोड उठविली़ त्यानंतर प्रकाश सावकार पोरेड्डीवार, अतुल मल्लेलवार, संतोष बोलुवार यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी श्री़रणजितकुमार यांना निवेदन दिले़ मात्र, पुढे अनेक युवक पोलिस अधीक्षक कार्यालयापुढे गेले़ तेथे गृहमंत्री तथा पालकमंत्री आऱआऱपाटील यांनी त्यांच्याशी चर्चा केली़ यावेळी आऱआऱपाटील यांनी अधिसूचनेमुळे गैरआदिवासींवर अन्याय झाल्याचे मान्य केले़ यासंदभात मुख्यमंत्र्यांशी बोलून सकारात्मक निर्णय घेण्यास सांगू, असे आश्वासनही त्यांनी दिले़


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
9LECA
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना