शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

पेसा विरोधात देसाईगंजमध्ये चक्काजाम

Tuesday, 12th August 2014 07:37:24 AM

गडचिरोली, ता. १२ : गडचिरोली जिल्हा हा आदिवासीबहुल घोषित करून शासनाने गैर आदिवासींवर अन्याय करणाºया अटी व शर्ती लादल्याने गैरआदिवासी समाजांचे हक्क हिरावले जातील, अशी भीती या समाजात निर्माण झाली आहे. त्यामुळे पेसा कायदा रद्द करण्यात यावा, यासाठी आज (ता. १२) देसाईगंजमध्ये  कडकडीत बंद पाडून आंदोलन करण्यात आले.  

जिल्ह्यातील १५९५ गावांपैकी १३११ गावांतील नोकरभरतीत वर्ग ३ व ४ च्या पदभरतीत १०० टक्के आदिवासी उमेदवारांची •ारती केली जाणार आहे. त्यामुळे गैरआदिवासींवर बेरोजगारीची कुºहाड कोसळेल, अशी भीती निर्माण झाली आहे़ त्यामुळे राज्यपालांच्या अध्यादेशाच्या विरोधात आज देसाईगंज येथे कडकडीत बंद पाळून कुरखेडा मार्गावरील टी पॉर्इंटवर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यामुळे सुमारे तास•ार वाहतूक ठप्प होती. यावेळी संतप्त आंदोलनकर्त्यांनी टायरही जाळले़ या आंदोलनात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विलास ढोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य योगीराज कुथे,माजी जिल्हा परिषद सदस्य रमाकांत ठेंगरी, दिगांबर मेश्राम, नगरसेवक मुरलीधर सुंदरकर, पंचायत समितीच्या उपसभापती प्रीती शंभरकर, प्रा. संजय कुथे, नानाभाऊ नाकाडे, शैलेश बरडे, नितीन राऊत, चेतनदास विधाते, श्रावण बुल्ले, माजी नगराध्यक्ष डॉ. महेश पापडकर, मीना शेंडे, अरुण कुंभलवार, विलास बन्सोड, बालाजी ठाकरे यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले होते. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
47UF1
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना