शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

सहकारी निवडणूक प्राधिकरणातील अधिकाऱ्यांच्या ग्रेड वेतनात कपात

Thursday, 5th March 2015 06:09:52 AM

 

गडचिरोली, ता. ५: राज्य सरकारने सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी स्थापन केलेल्या स्वतंत्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणातील पदनामांमध्ये बदल केला असून, ही पदे अवनत केली आहेत. यातील महत्वाच्या पदांच्या ग्रेड वेतनात कपात करण्याचा निर्णय घेऊन ही पदे कंत्राटी पद़धतीने भरण्याचेही शासनाने जाहीर केले आहे.

येत्या  तीन ते चार महिन्यांत सहकारी संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुका घेण्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण स्थापन करून त्यासाठी ४७ पदे निर्माण करण्यास मंत्रिमंडळाने ३० जानेवारी २०१३ च्या बैठकीत मान्यता दिली होती. त्यानुसार ३० मार्च २०१३ च्या अधिसूचनेद्वारे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण गठित करण्यात आले असून, ३१ आॅक्टोबर २०१३ च्या निर्णयान्वये प्राधिकरणासाठी ४४ पदे निर्माण करण्यास आणि या पदांची वेतनश्रेणी, पदभरती तसेच भरतीच्या प्रकाराबाबत कार्यवाही करण्यास शासनाने मान्यता दिली होती. मात्र या शासन निर्णयातील ३ पदे अवनत करून त्यांचे पदनाम बदलण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शिवाय काही पदांच्या वेतनश्रेणीतही सुधारणा करण्यात आली आहे. ही पदे कंत्राटी स्वरूपाची आहेत, हे येथे उल्लेखनीय.

राज्य शासनाच्या या नव्या निर्णयानुसार, सहकार निवडणूक अधिकारी आता सह सहकारी निवडणूक आयुक्त म्हणून ओळखले जातील. तसेच सहायक सहकार निवडणूक अधिका-यास उपसहकारी निवडणूक आयुक्त म्हणून संबोधण्यात येईल. ही पदे प्रस्तावित वेतनश्रेणीत कार्यरत असलेल्या सहकार विभागातील क्षेत्रिय अधिका-यांमधून प्रतिनियुक्तीने अथवा या वेतनश्रेणीतून सेवानिवृत्त झालेल्या अधिका-यामधून कंत्राटी तत्वावर भरण्यात येतील. या अधिका-यांना वयाच्या ६५ वर्षांपर्यंत काम करता येईल. मात्र या दोन्ही अधिका-यांच्या वेतनश्रेणीत सरकारने थोडी कपात केली आहे. सह सहकारी निवडणूक आयुक्तास १५६००-३९००० अधिक ग्रेड वेतन ७६०० जाहीर केले होते. आता ग्रेड वेतनात कपात करून ते ६६०० करण्यात आले आहे. पूर्वी उपसहकारी निवडणूक आयुक्तांची वेतनश्रेणी १५६००-३९००० अधिक ग्रेड वेतन ६६०० जाहीर केले होते. आता ग्रेड वेतनात कपात करून ते ५४०० करण्यात आले आहे

नवीन निर्णयानुसार, पूर्वीच्या प्रशासकीय अधिका-यास सहायक सहकारी निवडणूक आयुक्त म्हणून ओळखले जाणार असून, त्याच्या वेतनश्रेणीतील ग्रेड वेतनात ४०० रूपयांची कपात करून ते ४४०० करण्यात आले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
42A34
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना