शनिवार, 18 मे 2024
लक्षवेधी :
   अज्ञात वाहनाच्या धडकेत युवा अभियंता ठार: देसाईगंज येथील घटना             अस्वलाच्या हल्ल्यात तेंदूपाने तोडणारा मुलगा जखमी, कोरची तालुक्यातील खसोळा येथील घटना             रुग्णवाहिका खड्ड्यात जाताच झाली महिलेची प्रसूती, कोरची तालुक्यातील प्रकार           

जादुटोण्याच्या संशयावरुन वृद्धाला दिले तप्त सळाखीचे चटके, एटापल्ली तालुक्यातील दुसरी घटना

Saturday, 4th May 2024 11:31:56 PM

गडचिरोली,ता.५: जादुटोणा करीत असल्याच्या संशयावरुन बारसेवाडा येथील एक महिला आणि पुरुषाला जिवंत जाळल्याच्या घटनेआधी एटापल्ली तालुक्यात अशीच आणखी एक घटना घडली आहे. गावकऱ्यांनी वृद्धाला बेदम मारहाण करुन तप्त सळाखींचे चटके दिले. २९ एप्रिल रोजी जांभिया (गट्टा) येथे घडलेल्या या घटनेतील पीडित इसमाचे ना दलसू मुक्का पुंगाटी(६०) असे आहे.

याप्रकरणी पोलिसांनी राजू जोई(६०), झुरु पुंगाटी(५४), बाजू जोई(५५), रेणू पुंगाटी(५०), मैनू जोई(३९), शंकर जोई(३१), दिनकर जोई(२६) व विजू होळी (सर्व रा.जांभिया) या आठ जणांना अटक केली आहे.

दलसू पुंगाटी हा जादुटोणा करतो, अशा संशयावरुन गावातील काही नागरिकांनी २९ एप्रिलच्या रात्री त्याला एका समाजमंदिराजवळ नेले. तेथील मंडपात दलसूला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर त्याच्या अंगावर तप्त लोखंडी सळाखीचे चटकेही दिले. हा प्रकार रस्त्याने जाणाऱ्या एका इसमाने बघितल्यानंतर त्याने गट्टा पोलिस ठाण्याला माहिती दिली. दुसऱ्या दिवशी ३० एप्रिलला पोलिसांनी जांभिया येथे जाऊन घटनेची माहिती जाणून घेतली. त्यानंतर पोलिसांनी दलसू पुंगाटी यास एटापल्ली येथील ग्रामीण रुगणालयात दाखल केले. पुंगाटी यांच्या नातेवाईकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी राजू जोई, झुरु पुंगाटी, बाजू जोई, रेणू पुंगाटी, मैनू जोई, शंकर जोई, दिनकर जोई व विजू होळी यांना अटक केली.

………………….

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
4WDD3
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना