बुधवार, 15 मे 2024
लक्षवेधी :
  बालंबाल बचावले गडचिरोलीचे पोलिस! टिपागड पहाडावर आढळली शक्तीशाली स्फोटके             जादुटोण्याच्या संशयावरुन वृद्धाला दिले तप्त सळाखीचे चटके, एटापल्ली तालुक्यातील दुसरी घटना             जादुटोणा प्रकरण: दोघांना जिवंत जाळणाऱ्या १५ आरोपींना ५ दिवसांची पोलिस कोठडी             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             आयपीएलवर ऑनलाईन सट्टा: दोघांवर गुन्हे दाखल, देसाईगंज पोलिसांची कारवाई             गडचिरोली जिल्हा हादरला: जादुटोण्याच्या संशयावरुन दोघांना जीवंत जाळले, १४ जणांना अटक, एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा येथील घटना           

आयपीएलवर ऑनलाईन सट्टा: दहा जणांना अटक, अहेरी पोलिसांची कारवाई

Sunday, 28th April 2024 11:32:49 PM

गडचिरोली,ता.२९: आयपीएलवर ऑनलाईन सट्टा लावण्याच्या अड्ड्यावर अहेरी पोलिसांनी छापा टाकून १० जणांना अटक केली आहे. आरोपींकडून रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे.

निखील दुर्गे, आसिफ शेख, धनंजय गोगीवार, निखिल गुंडावार, प्रणीत श्रीरामवार, अक्षय गणमुकुलवार, फरमान शेख, फरदीन पठाण, इरफान शेख(सर्व रा.अहेरी) व संदीप गुडपवार रा.आलापल्ली अशी आरोपींची नावे आहेत.

अहेरी येथे आयपीएलवर ऑनलाईन सट्टा चालविण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी बालाजी गेस्ट हाऊसवर छापा टाकला. यावेळी तेथे nice.777.fun या अॅपवर ऑनलाईन सट्टा खेळून त्यावर पैसे उधळले जात असल्याचे दिसून आले. घटनास्थळी असलेले निखिल दुर्गे व आसिफ शेख यांच्याकडून चार मोबाईल आणि ९ हजार ४२० रुपये जप्त केले. या दोघांची चौकशी केली असता त्यांनी आम्ही केवळ एजंट आहोत, प्रत्यक्षात इरफान शेखच्या अपर लाईनला संदीप गुंडपवार हा सट्टा चालवित असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय खालच्या पातळीवर निखिल गुंडावार, प्रणीत श्रीरामवार, अक्षय गणमुकुलवार, फरमान शेख आणि फरदीन पठाण हेदेखील एजंट म्हणून काम करीत असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांच्यावर महाराष्ट्र जुगारबंदी कायद्याच्या कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली.

पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अहेरीचे अपर पोलिस अधीक्षक एम.रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी अजय कोकाटे, पोलिस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक जनार्दन काळे, गवळी, हवालदार कांबळे, संजय बोलीवार, पठाण, मडावी, शेंडे, केंद्रे, देवेंद्र दुर्गे, सूरज करपे, दहीफळे, भंडे यांनी ही कारवाई केली.

 ………………

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
EUA18
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना