सोमवार, 29 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आयपीएलवर ऑनलाईन सट्टा: दहा जणांना अटक, अहेरी पोलिसांची कारवाई             रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत           

खासदार अशोक नेते पुण्यात आदर्श खासदार पुरस्काराने सन्मानित

Tuesday, 30th January 2024 01:27:22 AM

गडचिरोली,ता.३०: पुणे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट्सतर्फे आयोजित दोन दिवसीय युवा संसदेत २९ जानेवारीला राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यात राज्याच्या टोकावरील गडचिरोली-चिमूर क्षेत्राचे खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांना आदर्श खासदार म्हणून सन्मानित करण्यात आले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली या युवा संसदेचे उद्घाटन करण्यात आले. याकार्यक्रमाला माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, माजी खासदार विकास महात्मे, जाधवर ग्रूपचे संस्थापक प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर, आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील, माजी महापौर दतात्रय धनकवडे, नगरसेवक गणेश बिडकर, कार्यक्रमाचे आयोजक अॅड.शार्दुल जाधवर उपस्थित होते.

तीन सत्रात झालेल्या या युवा संसदेत सामाजिक चळवळ आणि युवक,सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत,भारतीय राजकारणाची ७५ वर्षे-किती नैतिक, किती अनैतिक? अशा तीन विषयांवर मंथन करण्यात आले. यावेळी आपल्या भाषणात खा.अशोक नेते यांनी चांगले काम करण्यासाठी युवकांनी उच्च ध्येय ठेवण्याचे आवाहन केले.  गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात विपरित परिस्थितीत आणि ७५० किलोमीटरपर्यंत विस्तारलेल्या लोकसभा क्षेत्रात सर्वदूर संपर्क ठेवताना अनेक अडचणी येतात. पण या क्षेत्राच्या संपूर्ण विकासासाठी भविष्यातही मी कार्यरत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सोबतच दिलेल्या सन्मानासाठी त्यांनी आयोजकांचे आभार मानले.    

राजकारण, प्रशासन, न्याय व्यवस्था आणि पत्रकारिता या चार स्तंभाच्या आधारावर आपल्या लोकशाहीचा पाया मजबूतपणे उभा आहे. हे चारही घटक समाजव्यवस्थेत महत्वाचे आहेत. राजकारणाकडे सकारात्मक दृष्टिने पाहिल्यास त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतात. त्यामुळे युवा वर्गाने सामाजिक हितासाठी राजकारणात येण्याचे आवाहनही यावेळी खा.नेते यांनी केले. दहा वर्षाच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले.युवकांसाठी, सर्वसामान्य जनतेसाठी अनेक योजना कार्यान्वित केल्या, असेही खासदार नेते म्हणाले.

दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन

या कार्यक्रमासाठी पुण्यात आले असता खा. अशोक नेते यांनी सोमवारी संकष्ट चतुर्थीनिमित्त सुप्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात कुटुंबियासह दर्शन घेऊन आरती व पुजा केली. यावेळी अर्चना अशोक नेते, मुलगी अशिता हेसुद्धा उपस्थित होते.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
5UMJN
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना