/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.२: राज्याच्या महसूल व वनविभागाने विविध ठिकाणी कार्यरत ७४ नायब तहसीलदारांना पदोन्नती दिली असून, तहसीलदार म्हणून त्यांची पदस्थापना केली आहे. १ जून रोजी हा आदेश जारी करण्यात आला आहे.
नव्या पदस्थापनेत गडचिरोली जिल्ह्याला ७, तर चंद्रपूर जिल्ह्याला ८ तहसीलदार मिळाले आहेत. पी.एम.गड्डम हे कोरची येथील नवे तहसीलदार असतील. एस.डी.माने यांना आरमोरी, चेतन पाटील (मुलचेरा), हरिदास काळे (कुरखेडा),ओमप्रकाश गोंड(चामोर्शी), विशाल सोनवणे (धानोरा), तर श्रीधर राजमाने यांची एटापल्लीचे तहसीलदार म्हणून पदस्थापना करण्यात आली आहे.
शेजारच्या चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथील तहसीलदार म्हणून पी.एस.काटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाजी कदम (पोंभुर्णा), योगेश कोटकर(वरोरा), बबिता आळंदे(जिवती),स्वप्नील सोनवणे(सेलू),योगेश शिंदे(तळोधी बाळापूर), प्रिया जांबळे पाटील (गोंडपिपरी), तर विजय पवार यांची चंद्रपूरचे तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.