/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.२८: अज्ञात वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्याने दोन जण जागीच ठार झाले. ही घटना आज दुपारी अहेरी तालुक्यातील वेलगूर टोला गावानजीक घडली. रवी किष्टे(२१), रा. परभणी व धोंडिबा पवार(२२) रा.नांदेड अशी मृतांची नावे आहेत. रवी किष्टे हे पोस्टमन, तर धोंडिबा पवार हे पोस्टमास्तर होते.
अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा पोस्ट ऑफिसअंतर्गत कम्मासूर येथे रवी किष्टे हे पोस्टमन, तर धोंडिबा पवार हे पोस्टमास्तर म्हणून चार महिन्यांपूर्वीच रुजू झाले होते. २९ ते ३० जानेवारी या कालावधीत गडचिरोली येथे प्रशिक्षण असल्याने रवी किष्टे, धोंडिबा पवार हे अन्य सहकाऱ्यांसह आज दुपारी सहा मोटारसायकलींनी गडचिरोली येथे जात होते. पाच मोटारसायकली पुढे निघून गेल्या. परंतु रवी किष्टे आणि धोंडिबा पवार हे बरेच मागे राहिले. ते का आले नाहीत म्हणून अन्य सहकाऱ्यांनी मागे जाऊन बघितले असता दोघेही अपघातात ठार झाल्याचे निदर्शनास आले. अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघेही ठार झाल्याचा अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच अहेरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.