शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

मेटॅडोरच्या धडकेत एक ठार

Sunday, 7th December 2014 05:13:47 AM

 

गडचिरोली, ता़ ७

वाळूची वाहतूक करणार्‍या मेटॅडोरने धडक दिल्याने एक इसम जागीच ठार झाल्याची घटना आज ७ डिसेंबरच्या सकाळी ८ वाजताच्या सुमारास गडचिरोली येथील आयटीआय चौकात घडली़ रवींद्र नामदेव नन्नावरे (३०)असे मृत इसमाचे नाव असून, तो मुल तालुक्यातील राजोली येथील रहिवासी आहे़

आज सकाळी रवींद्र नन्नावरे हा कॉम्प्लेक्सवरून गडचिरोलीकडे पायदळ येत असताना आयटीआय चौकात एमएच ३३- ४३७४ क्रमांकाच्या मेटॅडोरने रवींद्रला धडक दिली़ यात त्याचा जागीच मृत्यू झाला़ या प्रकरणी गडचिरोली पोलिसांनी मेटॅडोर चालक विनोद कालिदास चुधरी रा़ चाकलपेठ यास ताब्यात घेतले आहे़


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
40UFM
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना