बुधवार, 8 मे 2024
लक्षवेधी :
  बालंबाल बचावले गडचिरोलीचे पोलिस! टिपागड पहाडावर आढळली शक्तीशाली स्फोटके             जादुटोण्याच्या संशयावरुन वृद्धाला दिले तप्त सळाखीचे चटके, एटापल्ली तालुक्यातील दुसरी घटना             जादुटोणा प्रकरण: दोघांना जिवंत जाळणाऱ्या १५ आरोपींना ५ दिवसांची पोलिस कोठडी             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             आयपीएलवर ऑनलाईन सट्टा: दोघांवर गुन्हे दाखल, देसाईगंज पोलिसांची कारवाई             गडचिरोली जिल्हा हादरला: जादुटोण्याच्या संशयावरुन दोघांना जीवंत जाळले, १४ जणांना अटक, एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा येथील घटना           

आंतरराज्यीय वाहतूक, सेतू केंद्रे, अन्य उद्योग बंद करण्याचे निर्देश

Monday, 23rd March 2020 06:52:06 AM

गडचिरोली,ता.२३:कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी काही निर्बंध घातले आहेत. जिल्ह्याच्या सीमेवरुन आंतरराज्यीय व आंतर जिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांना प्रतिबंध करण्यात आला आहे. मात्र, त्यातून पेट्रोलियम पदार्थ, दूध, भाजीपाला, औषधी, धान्य, वैद्यकीय उपकरणे तसेच जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यास परवानगी राहील.

जिल्ह्यातील सर्व सेतू केंद्रे बंद करण्यात येणार आहेत. तसेच जीवनावश्यक वस्तूंची निर्मिती करणारे उद्योग वगळता इतर सर्व उद्योग तत्काळ बंद करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. शिवाय ज्या घरी परदेशातून, इतर राज्यातून किंवा जिल्ह्यातून एखादी व्यक्ती आली असेल त्यांच्या घरी स्टीकर लावण्याची मोहीम हाती घेण्यात येत आहे. त्यासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांसोबत आशा किंवा नर्सिंग प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना सोबत घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. घरभेटीदरम्यान स्टीकर लावल्यानंतर प्रवाशांच्या डाव्या हाताच्या उलट्या भागावर होम क्वारंटाईन्ड चा शिक्का मारण्यात येणार आहे.

२३ मार्चपर्यंतची स्थिती

२३ मार्चपर्यंत जिल्ह्यात ३६ जणांना होम क्वारंटाईन्ड करण्यात आले आहे. त्यापैकी १९ जणांचे निरीक्षण पूर्ण झाले आहे, तर १७ जण अजूनही निरीक्षणाखालीच आहेत. त्यापैकी २ जण रुग्णालयात आहेत. आतापर्यंत ९ जणांचे सॅम्पल घेण्यात आले असून, ७ जणांना अहवाल निगेटिव्ह आला आहे. दोघांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे, अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली..


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
U1H49
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना