शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

‘प्रवरा’ वैद्यकीय अभिमत विद्यापीठातर्फे डॉ. अभय बंग यांचा ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ने गौरव

Wednesday, 11th March 2020 07:46:55 AM

गडचिरोली,ता.११: अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथील प्रवरा वैद्यकीय अभिमत विद्यापीठाद्वारे डॉ. अभय बंग यांना डॉक्टर ऑफ सायन्स(डी.एससी) सन्मान देऊन गौरविण्यात आले. विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय केळकर यांच्या हस्ते त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आली.

प्रवरा वैद्यकीय अभिमत विद्यापीठाचा १४ वा पदवीदान समारंभ नुकताच पार पडला. या सोहळ्यात विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय केळकर यांच्या हस्ते पद्मश्री डॉ. अभय बंग यांना डॉक्टर ऑफ सायन्स(डी.एससी) ही पदवी बहाल करण्यात आली. यावेळी प्रभारी कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वाय एम जयराज, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते पदवीदान समारंभात ३६३ पदवी, १२० पदव्युत्तर आणि ९ पीएचडी अशा ४९२ विद्यार्थ्यांना पदवी देऊन गौरविण्यात आले.

डॉ. बंग यांच्या गौरवार्थ डॉ. केळकर म्हणाले, आदिवासी भागात केवळ आरोग्यसेवाच न देता त्यांच्या आरोग्याच्या समस्या कशा कमी करता येतील, यासाठी सातत्याने संशोधन करण्याचे काम डॉ. अभय बंग आणि त्यांच्या पत्नी डॉ. राणी बंग हे गडचिरोली जिल्ह्यात ‘सर्च’ या आरोग्यसेवी संशोधन संस्थेद्वारे ३२ वर्षांपासून करत आहेत. भारतातील सार्वजनिक आरोग्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली आहे. दुर्गम आणि ग्रामीण भागातील नवजात बाळांना आरोग्यसेवा, बालमृत्यू आणि स्त्री आरोग्याच्या समस्यांबाबत त्यांनी तयार केलेला उपक्रम आज भारतासह अनेक देशांत राबवला जात आहे. ‘मुक्तिपथ’ या पथदर्शी प्रकल्पाद्वारे गडचिरोली जिल्हा दारू व तंबाखूमुक्त करण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे. आदिवासी आरोग्यासाठी त्यांनी केलेले कार्य ‘पायोनियर’ आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा वैद्यकीय विद्यार्थ्यांनी घेण्याचे आवाहन डॉ. केळकर यांनी केले.




तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
5J15N
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना