बुधवार, 8 मे 2024
लक्षवेधी :
  बालंबाल बचावले गडचिरोलीचे पोलिस! टिपागड पहाडावर आढळली शक्तीशाली स्फोटके             जादुटोण्याच्या संशयावरुन वृद्धाला दिले तप्त सळाखीचे चटके, एटापल्ली तालुक्यातील दुसरी घटना             जादुटोणा प्रकरण: दोघांना जिवंत जाळणाऱ्या १५ आरोपींना ५ दिवसांची पोलिस कोठडी             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             आयपीएलवर ऑनलाईन सट्टा: दोघांवर गुन्हे दाखल, देसाईगंज पोलिसांची कारवाई             गडचिरोली जिल्हा हादरला: जादुटोण्याच्या संशयावरुन दोघांना जीवंत जाळले, १४ जणांना अटक, एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा येथील घटना           

वंचित बहुजन आघाडीचा शुक्रवारी गडचिरोली नगर परिषदेवर मोर्चा

Monday, 6th January 2020 05:42:46 AM

गडचिरोली,ता.६: शहरातील जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शुक्रवारी १० जानेवारीला नगर परिषद कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

भारिप बहुजन महासंघाचे (दक्षिण)जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष गजानन कुकुडकर, भारिप बहुजन महासंघाचे(उत्तर) जिल्हाध्यक्ष प्रा.हंसराज बडोले, सल्लागार जी.के.बारसिंगे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष माला भजगवळी, जिल्हा उपाध्यक्ष नरेश महाडोळे, जिल्हा सचिव योगेंद्र बांगरे, ज्येष्ठ नेते पत्रूजी टेंभुर्णे, युवा नेते गुलाब मुगल, जिल्हा महासचिव डाकराम वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र बांबोळे, जिल्हा संघटक धर्मेंद्र गोवर्धन, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.योगेश नंदेश्वर, महिला आघाडीच्या नेत्या सीमा दुर्गे, ज्योती जनबंधू, ज्योती दहिकर, गीता भोयर, रंजना तागडे, वैशाली चुधरी, अनिल राऊत, डी.के.जांभुळकर, अनिल निकुरे, भोजू रामटेके यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघणार आहे. शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता चामोर्शी मार्गावरील पेपर मिल कार्यालयापासून मोर्चाची सुरुवात होणार आहे.

गोकुळनगर, चनकाईनगर, विवेकानंदनगर, रामनगर, इंदिरानगर, लांझेडा येथे अतिक्रमण करुन वास्तव्य  करणाऱ्या नागरिकांना तत्काळ जमिनीचे पट्टे द्यावे, २ वर्षांपासून रखडलेली घरकुल योजना त्वरित कार्यान्वित करावी, ३५ वर्षांपूर्वी घरकुल योजनेचा लाभ घेणाऱ्यांचे घरकुल जीर्ण झाले असून, त्यांना विनाअट घरकुल मंजूर करावे, वाढीव गृहकर व पाणीपट्टी कर रद्द करावे, मागील २० वर्षांपासून साफसफाईचे काम करणाऱ्या कामगारांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, भूमिगत गटारलाईनच्या कामाची सीबीआयमार्फत चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी व अन्य विविध प्रकारच्या १७ मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

शहरातील नागरिकांनी या मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या गडचिरोली शहर शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
0VC01
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना