शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020
लक्षवेधी :
  बालिकेवर अतिप्रसंग करणाऱ्यास १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा- विशेष सत्र न्यायालयाचा निवाडा             कार अपघातात प्रा.कालिदास टिकले व प्रा. विद्या टिकले हे शिक्षक दाम्पत्य ठार, कुरखेडा-देसाईगंज मार्गावरील कसारी फाट्यानजीकची घटना             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

युवतीवर बलात्कार करणाऱ्यास १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा

Thursday, 12th December 2019 01:05:39 PM

गडचिरोली,ता.१२: युवतीला आपल्या घरी नेऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या इसमास येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षांचा सश्रम कारावास व ६ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सुनील मारोती चिमुरकर(४५)रा.एकोडी,ता.चामोर्शी असे दोषी इसमाचे नाव आहे.

ही घटना २४ ऑगस्ट २०१८ ची आहे. या दिवशी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास पीडित युवती आपल्या गावी असताना सुनील चिमुरकर याने तिला सायकलवर बसवून आपल्या गावी नेले. त्यानंतर घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पीडितेने चामोर्शी पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यावरुन पोलिसांनी आरोपी सुनील चिमुरकर याच्यावर भादंवि कलम ३७६(फ) व ३२३ अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक निशा खोब्रागडे यांनी तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. आज या प्रकरणाचा निकाल लागला. फिर्यादी व अन्य साक्षदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य मानून जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी सुनील चिमुरकर यास भादंवि कलम ३७६(फ)अन्वये १० वर्षांचा सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड, तसेच भादंवि कलम ३२३ अन्वये एक वर्षाचा कारावास व १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील सचिन कुंभारे यांनी काम पाहिले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
N4CC8
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना