शनिवार, 11 मे 2024
लक्षवेधी :
  बालंबाल बचावले गडचिरोलीचे पोलिस! टिपागड पहाडावर आढळली शक्तीशाली स्फोटके             जादुटोण्याच्या संशयावरुन वृद्धाला दिले तप्त सळाखीचे चटके, एटापल्ली तालुक्यातील दुसरी घटना             जादुटोणा प्रकरण: दोघांना जिवंत जाळणाऱ्या १५ आरोपींना ५ दिवसांची पोलिस कोठडी             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             आयपीएलवर ऑनलाईन सट्टा: दोघांवर गुन्हे दाखल, देसाईगंज पोलिसांची कारवाई             गडचिरोली जिल्हा हादरला: जादुटोण्याच्या संशयावरुन दोघांना जीवंत जाळले, १४ जणांना अटक, एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा येथील घटना           

प्रा़ श्याम मानव यांचे शुक्रवारी गडचिरोलीत व्याख्यान

Wednesday, 19th November 2014 08:02:55 AM

 

गडचिरोली,ता़१९ 

राज्य शासनाने जादूटोणाविरोधी कायदा लागू केल्यानंतर या कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्रा़ श्याम मानव यांचे व्याख्यान शुक्रवारी २१ नोव्हेंबरला संध्याकाळी ६ वाजता धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले आहे़

यासंदर्भात समाजकल्याण विभागाच्या प्रभारी सहायक आयुक्त पुष्पलता आत्राम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, राज्यात जादूटोणाविरोधी कायदा लागू झाल्यानंतर ‘जादूटोणाविरोणा कायदा जनजागृती, प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समिती’ गठित करण्यात आली आहे़ प्रा़ श्याम मानव हे या समितीचे सहअध्यक्ष असून, कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी  संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे़ गडचिरोली येथे २१ नोव्हेंबरला त्यांचे व्याख्यान होणार आहे़ ‘वैज्ञानिक दृष्टिकोन व जादूटोणाविरोधी कायदा, चमत्कार, भूत, मंत्रतंत्र, जादूटोणा किती खरं? किती खोटं?’हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे़ यावेळी प्रा़ मानव हे ढोंगी बुवा सामान्य नागरिकांची कशी फसवणूक करतात, हेदेखील प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगणार आहेत़ नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पुष्पलता आत्राम यांनी केले़ यावेळी जगदीश बद्रे व अशोक गडकरी उपस्थित होते़


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
6PCCV
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना