शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

तत्काळ सुनावणीसाठी अॅड.जांभुळेंचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज : आ.डॉ.होळींची धाकधूक वाढली

Saturday, 28th September 2019 02:11:52 AM

गडचिरोली, ता.२८: गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले आमदार डॉ. देवराव होळी यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात अॅड.नारायण जांभुळे यांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्काळ सुनावणी घ्यावी, असा अर्ज श्री.जांभुळे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्याने आमदार डॉ.होळी यांची धाकधूक वाढली आहे.

ऑक्टोबर २०१४ मध्ये विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक झाली. त्यावेळी डॉ.देवराव होळी हे चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत होते. निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी शासनाकडे आपल्या वैद्यकीय अधिकारीपदाचा राजीनामा दिला होता. परंतु शासनाने डॉ.होळी यांचा राजीनामा स्वीकारला नव्हता. पुढे डॉ.देवराव होळी भाजपच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडूनही आले. परंतु शासनाने न स्वीकारलेला डॉ.होळी यांचा राजीनामा व अन्य मुदृयांवर त्यावेळी फॉरवर्ड ब्लॉक पक्षाकडून उभे राहिलेले अॅड. नारायण जांभुळे यांनी डॉ.होळी यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली होती. १९ जानेवारी २०१७ रोजी उच्च न्यायालयाने अंतिम निर्णय देत डॉ.देवराव होळी यांचे सदस्यत्व रद्द केले. त्यानंतर आ.डॉ.होळी यांनी सर्वोच्च न्यायालयात अपिल केले होते. सर्वोच्च न्यायालयाने १७ फेब्रुवारी २०१७ रोजी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली होती. हे प्रकरण तेव्हापासून सर्वोच्च्. न्यायालयात प्रलंबित आहे.

या प्रकरणावर सुनावणी होण्याची शक्यता असताना २३ सप्टेंबर रोजी नारायण जांभुळे यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला असून, विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्काळ सुनावणी घ्यावी, अशी विनंती केली आहे. येत्या दोन-चार दिवसांत या प्रकरणाची सुनावणी सुरु होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची यादी अद्याप जाहीर केलेली नाही. अशावेळी अॅड.जांभुळे यांनी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या अर्जामुळे आमदार डॉ.देवराव होळी यांची धाकधूक वाढली आहे. शिवाय त्यांना तिकिट देण्याविषयी पक्ष काय भूमिका घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
196EY
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना