रविवार, 22 सप्टेंबर 2019
लक्षवेधी :
  आष्टीच्या ठाणेदाराची सुशिक्षित दाम्पत्यास अभद्र वागणूक- जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांकडे केली तक्रार             आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करणार-जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची माहिती             निष्कृष्ट बंधारा बांधकाम प्रकरणी मृद व जलसंधारण विभागाचे उपविभागीय अभियंता, कनिष्ठ अभियंता व कंत्राटदारावर कोरची पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

सर्पदंशाने विद्यार्थ्याचा मृत्यू

Thursday, 5th September 2019 02:09:39 PM

कोरची, ता.५: येथील पार्वताबाई विद्यालयात दहाव्या वर्गात शिकणारा वैभव प्रेमदास मेश्राम या विद्यार्थ्याचा आज सर्पदंशाने मृत्यू झाला.

काल(ता.४) पहाटे वैभवला विषारी सापाने दंश केला. त्यानंतर वडिलांनी त्याला गावठी औषध दिले. त्यामुळे वैभवच्या प्रकृतीत सुधारणा वाटू लागली. परंतु काही वेळाने पुन्हा प्रकृती बिघडल्याने त्याला गडचिरोलीला हलविण्यात आले. परंतु उपचारादरम्यान आज पहाटे वैभवचा मृत्यू झाला.

वैभवचे वडील प्रेमदास मेश्राम हे मूळचे कुरखेडा तालुक्यातील घाटी येथील रहिवासी आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते १५ वर्षांपूर्वी कोरचीला आले. येथे झोपडी बांधून ते पत्नी, मुलगा व मुलीसह राहत होते. मोलमजुरी करुन ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. परंतु काल विषारी सापाने दंश केल्याने मुलगा वैभवचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्युमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.  


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
ZVU2E
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना