बुधवार, 8 मे 2024
लक्षवेधी :
  बालंबाल बचावले गडचिरोलीचे पोलिस! टिपागड पहाडावर आढळली शक्तीशाली स्फोटके             जादुटोण्याच्या संशयावरुन वृद्धाला दिले तप्त सळाखीचे चटके, एटापल्ली तालुक्यातील दुसरी घटना             जादुटोणा प्रकरण: दोघांना जिवंत जाळणाऱ्या १५ आरोपींना ५ दिवसांची पोलिस कोठडी             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             आयपीएलवर ऑनलाईन सट्टा: दोघांवर गुन्हे दाखल, देसाईगंज पोलिसांची कारवाई             गडचिरोली जिल्हा हादरला: जादुटोण्याच्या संशयावरुन दोघांना जीवंत जाळले, १४ जणांना अटक, एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा येथील घटना           

आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे गडचिरोलीची प्लॅटिनम ज्युबिली शाळा

Friday, 16th August 2019 02:18:19 AM

गडचिरोली, ता.१६: शहरातील नामांकित प्लॅटिनम ज्युबिली शाळा नव्या इमारतीत स्थानांतरित झाल्यानंतर शहराच्या वैभवात भर पडू लागली आहे. शाळेची देखणी इमारत आणि तेथील आवारात डौलाने फडकत असलेला तिरंगा आगंतुकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

१९७३ साली एका छोट्याशा इमारतीत सुरु झालेली प्लॅटिनम ज्युबिली शाळा यंदा आरमोरी मार्गावरील नव्या इमारतीत स्थानांतरीत झाली आहे. भव्य व देखणी इमारत, नऊ एकरातील मैदान आणि सभोवताल असलेली हिरवीगर्द वनराई या बाबी तेथील विद्यार्थ्यांच्या मनात चैतन्य फुलवीत आहेत. विशेष म्हणजे, अलीकडेच शाळेच्या मैदानात डौलाने फडकत असलेला तिरंगा हा लक्ष वेधून घेणारा ठरत आहे. आरमोरीकडून येणारा व्यक्ती कठाणी नदीच्या पुलावर येताच सर्वप्रथम लक्ष जाते ते या तिरंगयाकडे.

शाळेच्या आवारात असणारा व चोवीस तास फडकत राहणारा विदर्भातील हा एकमेव उंच राष्ट्रध्वज आहे. अशाप्रकारचा उंच तिरंगा नागपुरातील रेल्वेस्थानक व कस्तुरचंद पार्क येथे आहे. शाळेचे संचालक अजीज नाथानी यांच्या संकल्पनेतील हा भव्यदिव्य तिरंगा नागरिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरत आहे.

अजीजभाईं नवनव्या कल्पना राबवून शाळेला नवा लूक देण्याचा प्रयत्न करीत आहेत. नुकतीच त्यांनी काही झाडे बोलावली. स्वातंत्र्यदिनी शिक्षणाधिकारी श्री.उचे, प्रेस क्लबचे अध्यक्ष् जयंत निमगडे, ज्येष्ठ पत्रकार रोहिदास राऊत, मनोज ताजने, अरविंदकुमार खोब्रागडे, सुरेश नगराळे, संस्थेचे अध्यक्ष डॉ.कमरुद्दीन लाखानी, सचिव अजीज नाथानी, संचालक सर्वश्री अमीरअली नाथानी, शौकत धम्मानी, समीर हिराणी, निझार देवानी, प्राचार्य प्रदीप मिस्त्री यांच्या हस्ते तेथे वृक्षारोपण करण्यात आले.  

वृक्ष मोठे झाल्यानंतर काही दिवसांतच शाळा आणखी नयनरम्य दिसणार आहे. शाळा आणखी देखणी करण्याचा मानस शाळेचे सचिव अजीज नाथानी यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात प्लॅटिन्म ज्युबिली शाळा गडचिरोलीचे लँडमार्क ठरेल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
16XMT
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना