शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

गाढवी नदीच्या पुलावर ट्रक आणि झायलोची टक्कर

Friday, 14th November 2014 06:44:15 AM

 
गडचिरोली, ता़१४
विरूद्ध दिशेने येणार्‍या ट्रक व झायलो गाडीची ऐन पुलावर टक्कर झाल्याची घटना आज दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास आरमोरीनजीकच्या गाढवी नदीच्या पुलावर घडली़ मात्र, यात कोणतीही प्राणहानी झाली नाही़
व्यवसायाने शिक्षक असलेले प्रमोद संगमवार हे आपल्या मालकीच्या एम़एच़ ४० ए़सी ५०७४ क्रमांकाच्या झायलो गाडीने आपल्या कुटुंबीयांसह आरमोरीवरून गडचिरोलीच्या दिशेने जात होते़ गाडीत श्री़ संगमवार, त्यांची पत्नी, सासू, मुलगी व चालक धनपाल सेलोकर हे बसले होते़ गाडी गाढवी नदीच्या पुलावर येताच विरूद्ध दिशेने येणार्‍या ट्रकने गाडीला धडक दिली़ हा ट्रक नादुरुस्त असल्याने दुसर्‍या ट्रकला जोडून आणण्यात येत होता़ या अपघातात झायलो गाडीचा मागचा चाक पुलाचे कठडे तोडून खाली गेला, तर पुढील चाक पुलाच्या कठड्याला अडकून राहिला़ यामुळे गाडी नदीत कोसळली नाही आणि संगमवार कुटुंबीयांचे प्राण वाचले़ श्री़ प्रमोद संगमवार किरकोळ दुखापत झाली़ त्यांना आरमोरीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले़ घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक श्री़मोरे यांनी घटनास्थळ गाठून परिस्थिती आटोक्यात आणली़ 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
46LA0
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना