शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

गडचिरोलीतील १०२ पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह

Tuesday, 23rd April 2019 06:39:34 AM

गडचिरोली, ता.२३: नक्षलग्रस्त जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल जिल्ह्यातील १०२ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे.

सन्मानचिन्ह जाहीर झालेल्यांमध्ये ४ अपर पोलिस अधीक्षक, ३ सहायक पोलिस निरीक्षक, १६ पोलिस उपनिरीक्षक व ७९ पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. गडचिरोलीचे तत्कालिन अपर पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी व राजा रामासामी, तसेच सध्या कार्यरत महेंद्र पंडित, डॉ.हरी बालाजी हे सन्मानचिन्हाचे मानकरी ठरले आहेत. १ मे रोजी महाराष्ट्र दिनी त्यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. नक्षलग्रस्त जिल्ह्यातील १०२ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर होणे, ही बाब गौरवास्पद असल्याचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी म्हटले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
IHVWY
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना