शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

विहिरीत आढळले नवजात अर्भक

Tuesday, 19th February 2019 02:03:43 AM

देसाईगंज, ता.१९: तालुक्यातील कुरुड येथील एका पडीक विहिरीत नवजात अर्भक मृतावस्थेत आढळल्याने खळबळ माजली आहे.

कुरुड-कोंढाळा रस्त्यावर एक विहीर असून, ती बुजलेली आहे. आज काही नागरिकांना विहिरीत नवजात अर्भक दिसल्यानंतर वार्ता गावात पसरली. काही वेळाने पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतावस्थेतील अर्भक ताब्यात घेतले. अर्भक मुलगी असून, त्यामुळेच ते फेकण्यात आले की, अनैतिक संबंधातून जन्म झाल्याने तिला फेकून देण्यात आले, याबाबत परिसरात चर्चेला पेव फुटले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
5YDO1
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना