शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

प्रेस क्लबच्या गीतगायन स्पर्धेत महेश बोदलकर प्रथम

Monday, 7th January 2019 11:41:03 PM

गडचिरोली, ता.८: गडचिरोली प्रेस क्लबच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त घेण्यात आलेल्या गीतगायन स्पर्धेत महेश बोदलकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला.

स्थानिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात आयोजित गीतगायन स्पर्धेत जिल्ह्यातील ५३ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेचे बक्षीस वितरण गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगीता पिपरे यांच्या हस्ते व प्रेस क्लबचे अध्यक्ष अविनाश भांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी पत्रकार सुरेश पद्मशाली, रोहिदास राऊत, शेमदेव चापले, विलास दशमुखे, सुरेश सरोदे यासह स्पर्धेचे परीक्षक पंचायत समिती सदस्य मारुती इचोडकर, अमर खंडारे उपस्थित होते. या स्पर्धेला संजय धात्रक यांच्या चमूने संगिताची साथ दिली होती. यशस्वी स्पर्धकांना रोख बक्षिसे, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यात 'नमोस्तुते' या गिताने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे महेश बोदलकर यांना प्रथम, अपर्णा दरडे द्वितीय, हर्ष घ्यार यांना तृतीय तर विजया पोगडे व अपूर्वा सहारे यांना प्रोत्साहनपर बक्षीस देऊन नगराध्यक्ष योगीता पिपरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या स्पर्धेत स्पर्धकांनी विविध भावगीते सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रेस क्लबचे सचिव मनोज ताजणे, उपाध्यक्ष अरविंद खोब्रागडे, सहसचिव रूपराज वाकोडे, कोषाध्यक्ष नंदकिशोर काथवटे, जयंत निमगडे, नीलेश पटले, सुरेश नगराळे यासह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

(सोबत फोटो )


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
6BGM5
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना