शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

भाजप नेत्या रोशनी बैस, संगीता मेश्राम यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Thursday, 3rd January 2019 07:03:02 AM

आरमोरी, ता.३: भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाच्या प्रदेश सदस्या तथा महिला आघाडीच्या जिल्हा सचिव रोशनी बैस, तसेच तालुका सचिव संगीता मेश्राम यांनी आज काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आ.विजय वडेट्टीवार यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

आरमोरी नगर परिषदेच्या अध्यक्ष व ८ प्रभागांतील १७ नगरसेवक पदांसाठी येत्या २७ तारखेला निवडणूक घेण्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. त्यासाठी काँग्रेस पक्षाने आज केमिस्ट भवन येथे इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. यासाठी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व विधिमंडळ उपनेते आ.विजय वडेट्टीवार, पक्षाचे प्रदेश प्रवक्ते व निरीक्षक अतुल लोंढे, प्राचार्य बबनराव तायवाडे, माजी खासदार मारोतराव कोवासे, जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, माजी आमदार आनंदराव गेडाम, ज्येष्ठ नेते रवींद्र दरेकर, माजी आमदार हरिराम वरखडे, युवा नेते डॉ.नितीन कोडवते, हसनअली गिलानी, तालुकाध्यक्ष किशोर वनमाळी, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, जिल्हा परिषद सदस्य मनिषा दोनाडकर, देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी,देसाईगंजचे माजी नगरसेवक शहजाद शेख, सुदाम मोटवानी, अशोक वाकडे उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत रोशनी बैस यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याशिवाय भाजप महिला आघाडीच्या तालुका सचिव संगीता मेश्राम यादेखील काँग्रेसवासी झाल्या. आ.वडेट्टीवार यांनी त्यांचे पक्षाचा दुपट्टा व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यामुळे भाजप महिला आघाडीत खिंडार पडले आहे. तेथे महिला आघाडीत बऱ्याच दिवसांपासून धुसफूस होती.

मुलाखतीसाठी मोठी गर्दी...

आज दुपारी २ वाजता मुलाखतीस सुरुवात झाली. यावेळी एका प्रभागासाठी अनेक इच्छूक उमेदवारांनी मुलाखती दिल्या. संध्याकाळी उशिरापर्यंत मुलाखती सुरुच होत्या. लोकसभा निवडणुकीला तीन-साडेतीन महिने शिल्लक असताना आरमोरी नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने कॉग्रेसच्या जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांनी एका व्यासपीठावर येऊन एकजुटीचे दर्शन घडविल्याने कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
9C8I4
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना