शनिवार, 23 फेब्रुवारी 2019
लक्षवेधी :
  आरमोरी नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी भाजपचे हैदरभाई पंजवानी यांची बहुमताने निवड             दुसऱ्या दिवशीही पेंढरी येथे तालुका निर्मितीसाठी हजारो नागरिकांचे आंदोलन सुरुच             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

नक्षल वेशभूषेतील बुजगावण्यांचा वापर करु लागले नक्षलवादी

Friday, 30th November 2018 09:20:16 AM

गडचिरोली, ता.३०: अनेक सहकारी मारले गेल्याने कमकुवत झालेल्या नक्षल्यांनी आता पोलिसांचा घातपात करण्याचा नवा फंडा शोधून काढला आहे. जंगलात नक्षली वेशभूषेतील बुजगावणे बनावट शस्त्रासह उभे करुन पोलिसांचा घातपात करण्याचा हा नवा फंडा आहे.

छत्तीसगड राज्यातील सुकमा जिल्हा मागील अनेक वर्षांपासून नक्षल कारवायांनी धगधगत आहे. तेथे आतापर्यंत अनेक मोठ्या हिंसक कारवाया घडल्या आहेत. या जिल्ह्यातील किस्टाराम येथे केंद्रीय राखीव दलाची १५० क्रमांकाची बटालियन कार्यरत आहे. काल(ता.२९) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास केंद्रीय राखीव दलाच्या १५० क्रमांकाच्या बटालियनचे जवान किस्टाराम परिसरातील जंगलात नक्षलविरोधी मोहीम राबवीत असताना एक व्यक्ती झाडाला टेकून एसएलआर घेऊन दिसला. बारकाईने निरीक्षण केले असता ते नक्षली वेशभूषेतील बुजगावणे असल्याची खात्री पटली. पुढे जाताच आणखी चार बुजगावणे दिसले. त्यापैकी एक बुजगावणे महिलांच्या वेशभूषेतील होते. त्यातील एका बुजगावण्याखाली तब्बल ७ किलो स्फोटके पेरुन ठेवल्याचे आढळून आले. या स्फोटकांना काही अंतरावर वायर जोडून ठेवण्यात आला होता. जवानांनी ही स्फोटके शिताफीने काढून नष्ट केली. 

नक्षल्यांना बघताच पोलिसांनी गोळीबार केला असता किंवा स्फोटकांचा स्फोट घडविण्याची शक्यता होती. दोनपैकी एक क्रिया केली असती, तरी पोलिसांचा घातपात झाला असता. परंतु सतर्कता बाळगल्याने मोठा अनर्थ टळला. तणीस, जुने कपडे व काठ्यांचा वापर करुन शेतकरी हिंस्त्र रानटी पशूंपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी बुजगावण्याचा वापर करतात. आता नक्षलीदेखील असे बुजगावणे तयार करीत असून, ते हुबेहुब नक्षल्यांसारखे दिसत आहेत. आतापर्यंत नक्षल्यांनी मोबाईल वॉर, वेड्यांचे सोंग घेऊन हेरगिरी करणे, बालकांचा वापर करणे इत्यादी प्रकार वापरुन पोलिसांचा घातपात केल्याची उदाहरणे आहेत. परंतु नक्षली वेशभूषेतील बुजगावण्यांचा वापर करुन पोलिसांचा घातपात करण्याचा नवा फंडा नक्षल्यांनी आपल्या चळवळीच्या इतिहासात पहिल्यांदाच वापरला आहे. मात्र, या पहिल्याच फंड्यात त्यांना यश आले नाही.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
54185
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना