बुधवार, 19 डिसेंबर 2018
लक्षवेधी :
  गडचिरोली जिल्ह्यातील वर्ग ३ व ४ ची पदभरती स्थगित करा;अन्यथा जिल्हा कचेरीवर मोर्चा काढू-ओबीसी समाज संघटना व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा इशारा             प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे यंदाच्या 'गडचिरोली जिल्हा गौरव' पुरस्काराचे मानकरी-गडचिरोली प्रेसक्लबचा निर्णय, ६ जानेवारीला मान्यवरांच्या हस्ते होणार पुरस्कार प्रदान             जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाची रिपरिप, जनजीवन विस्कळीत             शेतकरी कामगार पक्ष फेब्रुवारीत गडचिरोलीत घेणार विदर्भातील शेतकऱ्यांची दुष्काळ परिषद-अलिबाग येथील मध्यवर्ती समितीच्या बैठकीत निर्णय             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           
वाढदिवसाच्या शुभेच्छा
अनिल धामोडे
जिल्हा प्रतिनिधी, दै. देशोन्नती, गडचिरोली
वाढदिवस : 19 डिसेम्बर
वाढदिवसाच्या शुभेच्छा
वाढदिवसाच्या शुभेच्छा

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
96%
नाही :
4%

ओबीसी आरक्षणासाठी शेकाप रस्त्यावरचा संघर्ष करेल:भाई रामदास जराते

Saturday, 24th November 2018 07:41:48 AM

चामोर्शी,ता.२४: शेतकरी कामगार पक्षाने महाराष्ट्रात आजवर रस्त्यावर उतरून कष्टकरी कामगारांचे अनेक लढे यशस्वीपणे लढले आहेत. कष्टकऱ्यांच्या प्रश्नांबरोबरच शेकाप आता जिल्ह्यातील ओबीसींच्या हक्कासाठी रस्त्यावरची लढाई लढेल,असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी केले. 

तालुक्यातील खंडाळा येथील नवयुवक मंडळाद्वारा कार्तिक एकादशीनिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेकापच्या महिला नेत्या जयश्री वेळदा,तर प्रमुख अतिथी म्हणून शेकापचे गडचिरोली विधानसभा चिटणीस भाई नरेश मेश्राम, पुरोगामी विद्यार्थी संघटनेचे जिल्हा चिटणीस अक्षय कोसनकर, तालुका चिटणीस दिनेश चुधरी, प्रकाश सहारे, रमेश चौखुंडे, राजू केळझरकर, प्रदीप आभारे, माजी पं.स.सदस्य प्रमोद भगत, श्री.सेलोकर, भेंडाळाचे पोलिस पाटील श्रीरंग म्हशाखेत्री, घारगावचे पोलीस पाटील आभारे, गुरुदेव सातपुते, जानकीराम ढोबे, नरेश पोरटे, नोमाजी सातपुते, प्रमोद गोर्लावार, भैयाजी मंगर, बालाजी झोडक प्रामुख्याने उपस्थित होते.

 

भाई रामदास जराते पुढे म्हणाले की, ओबीसीच्या हक्कासाठीचे आंदोलन तीव्र करण्याची गरज असून, मोठ्या संख्येने तरुणांनी रस्त्यावर उतरावे, या संघर्षासाठी लागणारी राजकीय ताकद शेकाप पुरवेल, तसेच येणाऱ्या काळात विधिमंडळात जिल्ह्यातून ओबीसींचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी निवडणुकीचे राजकारण करेल. यावेळी श्री.सेलोकर, प्रमोद भगत यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन अरविंद उंदिरवाडे तर प्रास्ताविक गुरुदेव सातपुते यांनी केले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
BH0A9
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना