शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

पोलिस शिपायावर अज्ञात इसमांचा गोळीबार, प्रकृती चिंताजनक

Saturday, 18th August 2018 06:33:09 AM

अहेरी, ता.१८: कुटुंबीयांसमवेत झोपेत असताना अज्ञात इसमांनी केलेल्या गोळीबारात पोलिस शिपाई गंभीर जखमी झाल्याची घटना काल(ता.१७)रात्री अहेरी-आलापल्ली मार्गावरील हसनबाग हॉटेलनजीक घडली. सुखदेव दशरथ कावळे(४५) असे जखमी शिपायाचे नाव आहे.

काल मध्यरात्री अज्ञात इसमांनी घराच्या खिडकीतून आत प्रवेश करुन सुखदेव कावळे यांच्यावर गोळीबार केला. आवाज येताच सुखदेवच्या पत्नीने आरडाओरड केली. शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेताच गोळीबार करणारे पळून गेले. रक्तबंबाळ झालेल्या सुखदेवला अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना चंद्रपूरला हलविण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपूरला नेण्यात आल्याची माहिती आहे. 

सुखदेव कावळे हे सिरोंचा पोलिस ठाण्यात कार्यरत होते. एका प्रकरणात निलंबित झाल्याने कोरची तालुक्यातील कोटगूल पोलिस मदत केंद्रात त्यांची पदस्थापना करण्यात आली होती, अशी माहिती आहे. मात्र, हल्लेखोर कोण होते आणि त्यांनी कावळे यांच्यावर कशासाठी हल्ला केला, हे समजलेले नाही.उपविभागीय पोलिस अधिकारी बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्री.होडगर घटनेचा तपास करीत आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
8T4P4
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना