शुक्रवार, 19 एप्रिल 2019
लक्षवेधी :
  वऱ्हाड घेऊन जाणारे वाहन उलटून तीन जण ठार, १२ जण जखमी-चामोर्शी तालुक्यातील भिवापूरनजीकची घटना             शेतकऱ्यांना अडचणी येऊ नयेत याची खबरदारी घ्या: जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे कृषिविभागाला निर्देश             नर्सिंग कॉलेज शिष्यवृत्ती गैरव्यवहार प्रकरण:डॉ. प्रमोद साळवे यांच्यावरील एफआयआर उच्च न्यायालयाकडून रद्द             भीषण अपघातात चार ठार, १७ जण जखमी, नऊ जणांची प्रकृती गंभीर-आलापल्ली-पेरमिली मार्गावरील मेडपल्ली गावाजवळची घटना             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

८ पोलिसांना राष्ट्रपती शौर्य पदक, तर ९ जणांना वेगवर्धित पदोन्नती

Tuesday, 14th August 2018 01:21:38 PM

गडचिरोली, ता.१४: स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आज केंद्र सरकारने देशभरातील पोलिस दलातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती शौर्यपदक जाहीर केले आहे. यात गडचिरोली जिल्ह्यातील ८ कर्मचाऱ्यांचा समावेश असून, त्यातील तिघे जण पोलिस उपनिरीक्षक, तर पाच जण शिपाई आहेत. शिवाय, ९ जणांना नक्षलग्रस्त भागात चांगली कामगिरी बजावल्याबद्दल वेगवर्धित पदोन्नती देण्यात आली आहे.

राष्ट्रपती शौर्यपदक जाहीर झालेल्यांमध्ये पोलिस उपनिरीक्षक सर्वश्री शीतलकुमार डोईजड, हर्षद काळे, अमितकुमार पाटील, तसेच पोलिस शिपाई प्रभाकर मडावी,सीताराम काटेंगे, महेश जाकेवार, राजेंद्र ताडामी, सोमनाथ पवार यांचा समावेश आहे. नक्षलग्रस्त भागात उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल पोलिस शिपाई सुधाकर रापंजी, महादेव मडावी, बंडू आत्राम, अशोक मज्जीरवार, संतोष आत्राम, कोतला कोरामी, डोलू आत्राम, संजय आसम व महादेव वानखेडे यांचा समावेश आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना १५ ऑगस्ट रोजी सन्मानित करण्यात येणार आहे.

गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे व पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी राष्ट्रपती शौर्यपदकाचे मानकरी ठरलेल्या व वेगवर्धित पदोन्नतीस पात्र ठरलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
M045B
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना